Contest 
पुणे

सिंधी समाज संस्थेच्या वतीने विविध ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - सिंधी भाषा दिनानिमित्त अखिल भारतीय सिंधी समाज संस्थेच्या वतीने मंगळवारी (ता. 14) विविध ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 

सिंधी भाषेचा 10 एप्रिल 1967 ला भारतीय संविधानाच्या आठव्या अनुच्छेदामध्ये समावेश करण्यात आला. त्यानिमित्त 10 एप्रिल हा दिवस या समाजाच्या वतीने सिंधी भाषा दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. यानिमित्त विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येते. यंदा कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी 14 एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत समाजबांधवांनी आपल्या घरामध्ये राहून निरनिराळे पदार्थ बनवावेत.

भगवान झुलेलाल व इतर देवांची गाणी म्हणून त्यांची आराधना करावी अशा अनोख्या स्पर्धांचे आयोजन केले आहे. स्पर्धेत भाग घेत असताना त्याचे चित्रीकरण करून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे पाठवावे. तसेच सिंधी भाषेमध्ये विविध विषयांवर लेख लिहून ते संस्थेच्या कार्यालयाकडे पाठविण्याचेही आवाहनही करण्यात आले आहे. समाज संस्थेचे पदाधिकारी मनोहर जेठवानी यांनी सांगितले, 'या स्पर्धेचा अंतिम निकाल कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर जाहीर करण्यात येतील. स्पर्धेमधील विजेत्यांना पारितोषिक वितरणाचा समारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. जास्तीतजास्त नागरिकांनी स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे.'' यासंदर्भात संस्थेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी यू-ट्यूबच्या माध्यमातूनही सिंधी भाषेत आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Natural Reservoir Bursts : ‘बिकट परिस्थितीतून नेपाळी सैन्याने वाचविले’; नेपाळी सैन्याच्या मदतीची नागरिकांनी केली प्रशंसा

Nasrapur Crime : सारोळा गावात थरार! पत्नीच्या प्रियकराचा चाकूने भोसकून खून; आरोपी पतीला अटक

Nepal Natural Reservoir Bursts : नेपाळने नाकारली बचाव पथकांची मदत; नेपाळी सुरक्षा पथकांकडून शोध सुरूच

Truck Bike Accident : रक्षाबंधनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला! ट्रक-दुचाकीच्या अपघातात वडील-मुलीचा मृत्यू; आई गंभीर

Nepal Natural Reservoir Bursts : नेपाळमध्ये जलप्रलय! नैसर्गिक जलाशय फुटला; नेपाळ-चीन सीमेवरील भागांना पुन्हा पुराचा धोका

SCROLL FOR NEXT