पुणे

महाविद्यालयीन शिक्षकेतर

CD

प्रलंबित प्रश्नांसाठी संघटित लढ्याचा निर्धार

कऱ्हाडला महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाची बैठक

कऱ्हाड, ता. १७ ः महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून ते सोडविण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार येथे झालेल्या बैठकीत करण्यात आला.


महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या वतीने येथील सद्‍गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात बैठक झाली. महासंघाचे पदाधिकारी डॉ. सुजित आर. बी. सिंग, सरचिटणीस रा. जा. बडे, कार्याध्यक्ष कामटे, दिलीप गुरव, वसंत जोशी (पुणे), उपप्राचार्य एस. ए. पाटील, दिलीप मोरे, दिलीप पवार, अनिल लबरे, महेंद्र शेंबके, अनिल घाडगे, उपाध्यक्ष हितेंद्र साळुंखे यांच्यासह शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व सातारा, सांगली, कल्याण येथील महासंघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष व कार्यकारिणीची निवड करण्यात आली. एसजीएमचे संतोष पवार यांची जिल्हाध्यक्षपदी, उपाध्यक्षपदी श्री. साठे, तर जिल्हा सरचिटणीसपदी राजेश भोसले यांची एकमताने निवड झाली.

कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवरही बैठकीत चर्चा झाली. दिलीप मोरे यांनी कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. डॉ. सुजित आर. बी. सिंग व महासंघाचे अध्यक्ष बडे यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत भूमिका स्पष्ट केली. सातवा वेतन आयोगातील १०, २० व ३० वर्षांच्या आश्वासित प्रगती योजनेसह ग्रेड पे २४००, २८०० याबाबतच्या मागण्यांवरही चर्चा झाली. या प्रश्नांचा पाठपुरावा करून लवकरच योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
उपप्राचार्य पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष अनिल घाडगे यांनी मार्गदर्शन केले. उपाध्यक्ष अशोक जाधव यांनी प्रास्ताविक केले. जिल्हाध्यक्ष पवार यांनी आभार मानले.


PNE26W42846
कऱ्हाड ः बैठकीत बोलताना डॉ. सुजित आर. बी. सिंग. त्या वेळी रा. जा. बडे, कामटे, दिलीप गुरव, वसंत जोशी, एस. ए. पाटील आदी.
...................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले, पण घरी परतलेच नाहीत; शिवाजी पार्कात ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Puttu Recipe: इडली पात्रात बनवा चविष्ट 'पुट्टू'! केरळच्या घराघरांत बनणारा पौष्टिक पदार्थ; पाहा सोपी रेसिपी...

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

SCROLL FOR NEXT