पुणे

रुग्णसेवेला समर्पित व्यक्तिमत्त्व बारामतीतील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. गोकूळ काळे

CD

रुग्णसेवेला समर्पित व्यक्तिमत्त्व
बारामतीतील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. गोकूळ काळे

बारामती शहरातील आरोग्यसेवेत अस्थिरोग उपचाराच्या क्षेत्रात विश्वासार्ह नाव म्हणून डॉ. गोकूळ काळे यांची ओळख निर्माण झाली आहे. आधुनिक वैद्यकीय ज्ञान, अद्ययावत उपचारपद्धती आणि रुग्णांप्रति असलेली संवेदनशीलता यांच्या बळावर त्यांनी अनेक रुग्णांना नवसंजीवनी दिली आहे. हाडे, सांधे, स्नायू आणि मणक्यांशी संबंधित विविध आजारांचे अचूक निदान करून योग्य उपचार देणे, ही त्यांची खासियत मानली जाते. अपघातामुळे झालेल्या फ्रॅक्चरपासून गुडघेदुखी, कंबरदुखी, खांदेदुखी, सांध्यांची झीज, क्रीडाजन्य दुखापती, तसेच ज्येष्ठ नागरिकांमधील अस्थिविकारांवर ते प्रभावी उपचार करतात. आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया आणि शस्त्रक्रियेशिवाय उपचार या दोन्ही पर्यायांचा संतुलित वापर करून रुग्णाला लवकरात लवकर पूर्ववत जीवन जगता यावे, यासाठी ते प्रयत्नशील असतात.
रुग्णाशी सविस्तर संवाद साधून त्याच्या आजाराचे स्वरूप समजावून सांगणे, योग्य मार्गदर्शन करणे आणि उपचारांबरोबरच व्यायाम, फिजिओथेरपी व जीवनशैलीतील आवश्यक बदलांवर भर देणे, ही डॉ. गोकूळ काळे यांच्या उपचारपद्धतीची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे रुग्णांमध्ये त्यांच्याविषयी विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील नवीन संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि उपचारपद्धतींचा सातत्याने अभ्यास करून त्या प्रत्यक्ष उपचारांमध्ये वापरण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना मोठ्या शहरांतील दर्जेदार अस्थिरोग सेवा बारामतीतच उपलब्ध होत आहे.

सामाजिक बांधिलकी जपली
डॉ. गोकूळ काळे यांनी वैद्यकीय व्यवसायाकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य जनजागृती, हाडांचे आरोग्य, ऑस्टिओपोरोसिस प्रतिबंध, अपघातानंतरची काळजी आणि योग्य व्यायाम याबाबतही समाजात जागरूकता निर्माण करण्याचे कार्य केले आहे. सेवाभाव, तांत्रिक कौशल्य आणि रुग्णकेंद्रित उपचारपद्धती यांच्या जोरावर डॉ. गोकूळ काळे यांनी बारामती परिसरात एक विश्वासार्ह अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून, निरोगी समाज घडविण्यात त्यांचे योगदान निश्चितच उल्लेखनीय ठरत आहे. मेडीकोज गिल्डचे विद्यमान अध्यक्ष म्हणून सामाजिक बांधिलकी जपत अनेक लोकोपयोगी उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

वाजवी दरात उपचार
डॉ. गोकूळ काळे यांची एक शैली आहे. गरज असेल तरच गोळ्या- औषधे देणार किंवा अगदी नाइलाज असेल तरच शस्त्रक्रियेचा सल्ला देणार. त्यांच्या रुग्णालयातील उपचार तुलनेने अत्यंत वाजवी असतात, हे त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात उज्वल निकमांची एंट्री; विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Loan EMI Tips: कर्ज लवकर फेडण्यासाठी या 4 स्मार्ट टिप्स फॉलो करा! नवीन लोन घेताना 'या' 10 चुका अजिबात करू नका

Women Health: महिलांना चाळीशीनंतर सतत लघवीला का जावं लागतं? डॉक्टरांनी सांगितली त्यामागची खरी कारणं

Latest Marathi News Live Update : प्रियांका गांधींनी कुंभार समाजाच्या समस्यांबाबत आढावा बैठकीचे अध्यक्षपद भूषवले

Raigad Entrepreneurs Honoured: रायगडचा मान उंचावला; ‘नेक्स्टजेन डिजिटल’चे श्रीकांत जाधव व ‘अलोरवेदा’च्या पूजा खेडेकर यांना राष्ट्रीय ‘एमएसएमई स्टार पुरस्कार २०२६’

SCROLL FOR NEXT