ओतूर, ता. २२: ओतूर (ता. जुन्नर) आणि परिसरात सोमवारी दुपारी झालेल्या मुसळधार पाऊस पडला. यामुळे
नागरिकांना असह्य उकाड्यापासून दिलासा मिळाला. वेगवान वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
ओतूरसह उदापूर, डिंगोरे, डुंबरवाडी परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. ओतूर शहरात रस्त्यांवर पाणी साचले होते. या पावसामुळे खरीप हंगामाच्या कामांना गती मिळण्याची आशा व्यक्त होत आहे. दरम्यान, डिंगोरे येथे वेगवान वाऱ्यामुळे एका शेडचे पत्रे उडाले तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. काही भागांतील वीजपुरवठाही खंडित झाला होता. मात्र, तापमानात घट झाल्याने नागरिकांनी पावसाचे स्वागत केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.