पुणे

मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या तिघांना दंड

CD

ओतूर, ता. २१ : मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध ओतूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. मोटार वाहन अधिनियम कलम १८५ अंतर्गत दाखल तीन प्रकरणांमध्ये आरोपींनी न्यायालयात गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर न्यायालयाने प्रत्येकी १० हजार रुपयांच्या द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली.
यामध्ये जुन्नर तालुक्यातील धोलवड येथील अनिल नामदेव नलावडे (वय ४८), हपुसबाग येथील अनिकेत सोमनाथ डोके (वय २१) आणि ओतूर येथील सुशांत दिलीप ठिकेकर (वय ३८) यांच्याविरुद्ध ओतूर पोलिसांनी कारवाई केली होती. या प्रकरणांची सुनावणी जुन्नर येथील न्यायालयात झाली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याने न्यायालयाने तिघांनाही प्रत्येकी १० हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली.
न्यायालयीन कामासाठी पोलिस कर्मचारी ए. एम. भेके, महिला पोलिस मनीषा ताम्हणे, पोलिस कर्मचारी किशोर बर्डे व श्यामसुंदर जायभाये यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price: सणासुदीच्या काळात साखरेचे भाव गगनाला! दर नियंत्रणासाठी सरकारने उचलली कठोर पावलं; इथेनॉलमुळे खरंच भाव वाढले?

नवे-जुने मराठी चित्रपट आणि वेबसीरिज एकाच OTTवर; ‘८ वाजून १३ मिनिटे’ ते ‘कैरी’पर्यंत पाहा काय खास

Marathi News Live Updates : दिल्ली पोलिसांनी 'रॅपिड ॲक्शन फोर्स'च्या मदतीने जंतरमंतरवर जमलेल्या आंदोलकांना ताब्यात घेतले

कमाल अमरोहींच्या प्रेमात होत्या मधुबाला; लग्नासाठी दिलेली 'ही' ऑफर, म्हणाल्या- पत्नी मुलांना सोडून द्या, मी तुम्हाला...

Karad Crime : कऱ्हाडला महिलेचा चारित्र्याच्या संशयावरून गळा आवळून निर्घृण खून; खून केल्यानंतर संशयीत पोलिसात हजर

SCROLL FOR NEXT