पुणे

ओतूर परिसरात पिके कुजण्याचा धोका

CD

ओतूर, ता. २३ : ओतूर (ता. जुन्नर) परिसरात मंगळवारी (ता. २३) सकाळपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली. दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. कोथिंबीर, मेथी, शेपू, टोमॅटो, मिरची, काकडी, कोबी तसेच फुलपिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जास्त पाणी सहन होत नसल्याने पिके कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे.
ओतूर, उदापूर, डिंगोरे, पिंपळगाव जोगा, बल्लाळवाडी, पांगरी माथा, नेतवड, माळवाडी, डुंबरवाडी, खामुंडी, डोमेवाडी, रोहोकडी व इतर परिसरात मुसळधार पाऊस पडला. दिवसभर अधूनमधून सुरू राहिलेल्या पावसामुळे जनजीवनावरही परिणाम झाला. पावसामुळे सोमवारी आनंदित झालेल्या शेतकऱ्यांची मंगळवारी चिंता वाढली. सततच्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने तरकारी पिकांना धोका निर्माण झाला आहे. सलग पाऊस कायम राहिल्यास लाखो रुपयांचे नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
विशेषतः अल्प कालावधीत तयार होणाऱ्या कोथिंबीर, मेथी आणि कांदापात या पिकांवर पावसाचा मोठा परिणाम होत आहे. टोमॅटो, मिरची, काकडी, कोबी तसेच विविध फुलपिकांमध्ये रोगराई वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

खरीप हंगामासाठी पोषक वातावरण
पावसाचा जोर कायम राहिल्यास कृषी व महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. पावसामुळे खरीप हंगामासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असले तरी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी मात्र हा पाऊस डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र सध्या ओतूर परिसरात पाहायला मिळत आहे.

02062

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyadhar Anaskar : आरबीआयच्या नव्या पतधोरणामुळे सर्वसामान्यांचे कर्ज महागण्याची शक्यता; समतोल राखण्याचे बँकिंग क्षेत्रासमोर आव्हान

Beed News : बीडच्या एलसीबी पथकाचा सन्मान! अंबाजोगाईतील घरफोडीचा छडा लावून ४५ तोळे सोने, १६०० ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात धडाकेबाज कामगिरी

Sakal Karandak Competition : पुणे विभागातून ‘लाजाळू’ अंतिम फेरीत; ‘ईमान’ला द्वितीय; ‘नातीगोती’ला तृतीय क्रमांक

Delhi Building Collapse: दिल्लीत भीषण दुर्घटना! चार मजल्यांची इमारत कोसळली, गरोदर मातेसह तिघांचा मृत्यू

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सातव्या दिवशीही कायम

SCROLL FOR NEXT