ओतूर (ता. जुन्नर) - बहीण भावांची तेरा वर्षांनी भेट घडवून आणलेले शांताराम वारे (उजवीकडून दुसरे), श्रद्धा फाउंडेशनच्या समाजसेविका, विमल खंडागळे (डावीकडून तिसरी) व भाऊ.
ओतूर (ता. जुन्नर) - बहीण भावांची तेरा वर्षांनी भेट घडवून आणलेले शांताराम वारे (उजवीकडून दुसरे), श्रद्धा फाउंडेशनच्या समाजसेविका, विमल खंडागळे (डावीकडून तिसरी) व भाऊ. 
पुणे

ओतूरला १३ वर्षांनी बहीण-भावांची भेट

सकाळवृत्तसेवा

ओतूर - एखाद्या सिनेमात घडावा असा प्रसंग ओतूर (ता. जुन्नर) येथील आदिवासी भागातील नागरिकांना अनुभवायला मिळाला. ओतूर येथील मुंजेवाडीतील खंडागळे कुटुंबात हा प्रसंग घडला.

येथील विमल गंगाराम खंडागळे ही मनोरुग्ण होती. ती १३ वर्षांपूर्वी बेपत्ता झाली. मुंबईत मुख्य शाखा असलेल्या श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाउंडेशनच्या दोन कार्यकर्त्या विमलला सांगत असलेल्या पत्त्यावर ओतूरला घेऊन आल्या. येथेच ताटातूट झालेल्या बहीण व दोन भावांची भेट झाली. 

फाउंडेशनच्या कार्यकर्त्या ज्योती राऊत व ज्योत्स्ना निकंबे यांचे खंडागळे बंधूंनी आभार मानले. राऊत व निकंबे म्हणाल्या, ‘‘दोन वर्षांपूर्वी जय अंबे महिला ट्रस्ट गुजरातमधून केसर हिला फाउंडेशनमध्ये दाखल करण्यात आली. त्या वेळी तिला काही आठवत नव्हते. उपचारानंतर तिला आठवू लागले. तिने ती ओतूर येथील असल्याचे सांगून शांताराम वारे यांचे ही नाव सांगितले आणि ओतूरला आपणास नेल्यास घरी जाऊ शकते, असेही सांगितले.’’

नावामुळे अडचण
केसरला घेऊन ओतूरला आलो व शांताराम वारे यांच्याशी संपर्क झाला. मात्र, केसर चुकीचे नाव सांगत असल्यामुळे अडचण निर्माण झाली. तिला भाऊ कोठे कामाला होता, त्या दुकानदाराचे नाव माहीत होते. त्यावरून देवराम खंडागळे व किसन खंडागळे यांची तेरा वर्षांपूर्वी एक मनोरुग्ण बहीण बेपत्ता असल्याचे समजले. त्यावरून दोन्ही भावांना बोलावले. त्यांनीही बहिणीला ओळखले, असे निकंबे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT