Bheem_Chhava_Organization 
पुणे

पत्रकार रायकरांच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : प्रशासनाच्या गलथान कारभारामुळेच पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आणि दोषींवर कारवाई करण्यासाठी 'भीम छावा'चे प्रदेशाध्यक्ष श्याम गायकवाड यांच्या नेतृत्वात शुक्रवारी (ता.४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी प्रशासनाच्या विरोधी घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात युवक आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. 

पत्रकार रायकर यांच्या मृत्युला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. रायकर यांच्या परिवारातील सदस्यांना सरकारी नोकरी देण्यात यावी. रायकर यांच्या परिवाराला त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले. 

या आंदोलनात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्याम गायकवाड, निलेश गायकवाड, मंगेश कांबळे, विशाल कांबळे, अनिकेत साखरे, शहराध्यक्ष अमित मोरे, चंद्रकात सोनकांबळे, ज्ञानेश्वर गायकवाड, नितिन आहिरे, सचिन गायकवाड, प्रतिक कांबळे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: जंतर-मंतर आंदोलनानंतर आता शाळांवर अभिजीत दिपकेंचा फोकस! शाळा सुधारा अभियान राबवणार; 'या' जिल्ह्यातून शुभारंभ होणार

Swapnil Lande Bhondubaba News: पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

‘तुम्ही बीवी पगलू आहात?’ KBC 18 मध्ये अमिताभ बच्चन यांना थेट सवाल; म्हणाले, ‘मी जयाचा...’

Marathi News Live Updates :  दोन-चार दिवसांत 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, कृषीमंत्र्यांची घोषणा 

Genelia Emotional Post: पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

SCROLL FOR NEXT