Crime sakal media
पुणे

दंड भरण्यास सांगितल्याच्या रागातून महिला पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहनावर असलेला प्रलंबित दंड भरण्यास सांगणाऱ्या महिला वाहतुक पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून, शिवीगाळ करण्याचा प्रकार वाहन चालकाने केला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहनावर असलेला प्रलंबित दंड भरण्यास सांगणाऱ्या महिला वाहतुक पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून, शिवीगाळ करण्याचा प्रकार वाहन चालकाने केला. पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना महिला पोलिस कर्मचाऱ्याने त्यास अडविण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याने महिला पोलिस कर्मचाऱ्यासह कार वेगात नेली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी वाहन चालकास अटक केली.

वैभव हरिश्‍चंद्र जंगम (वय 31, रा.तळवदे, महाबळेश्‍वर, सातारा) असे अटक केलेल्या वाहनचालकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध मोटार वाहन कायदा व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी येरवडा वाहतुक विभागातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे. फिर्यादी बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास येरवडा येथील चंद्रमा चौकात वाहतुक नियमन व कारवाई करीत होत्या. त्यावेळी जंगम हा त्याच्या ताब्यातील कार घेऊन खडकीहून येरवड्याच्या दिशेने जात होता.

चौकात आल्यानंतर फिर्यादींनी त्याच्या कारचे छायाचित्र ई-चालान मशीनवर घेऊन त्याची माहिती घेतली, त्यावेळी वाहनाचा विमा व फिटनेसची वैधता संपल्याचे निदर्शनास आले. त्यावर 600 रुपयांचा दंड प्रलंबित असल्याचे दिसल्याने फिर्यादीने त्यास कार बाजुला घेण्यास सांगितले. त्यावेळी जंगम याने कार न थांबविता भरधाव वेगाने निघून गेला. फिर्यादीने संबंधीत वाहनावर मोटार वाहन कायद्यानुसार बाराशे रुपयांची दंडाची रक्कम संबंधीत चालकाच्या नावावर टाकली. त्यानंतर कारचालक जंगम हा फिरून फिर्यादीकडे आला. त्याने फिर्यादीस ओरडून, अपशब्द वापरुन "तुला कोणी अधिकार दिला, माझ्या गाडीवर पावती टाकण्याचा आणि पावती कशाबद्दल टाकली ते सांग' अशा शब्दात धमकी दिली. त्यानंतर फिर्यादीने त्यास कारसह येरवडा वाहतुक विभागात आणले, तेव्हा, जंगम हा पुन्हा कार घेऊन तेथून पळून जावू लागला. त्यावेळी फिर्यादी त्याला अडविण्यासाठी गाडीमध्ये बसल्या. तेव्हा जंगम याने गाडी न थांबविता, पुन्हा चंद्रमा चौक, आंबेडकर चौक, चंद्रमा चौकापर्यंत नेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balochistan Blast : बलुचिस्तानात पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर मोठा हल्ला; २३ जवानांचा मृत्यू , BLAचा हात असल्याचा संशय

राष्ट्रपतींच्या ADCला करता येत नाही लग्न, काय असतात अटी? कशी होते निवड? १ जागा, ३० जण शॉर्टलिस्ट, १४ दिवसांची मॅरेथॉन मुलाखत

रस्त्यावर झोपून काढले दिवस, आज दीड एकरमध्ये उभा आहे आलिशान बंगला; पाहा मिथुन चक्रवर्तींच्या घराची झलक

Marathi News Live Updates : अरविंद केजरीवाल यांची 'गोवा फॉरवर्ड पार्टी' आणि 'आम आदमी पार्टी' च्या युतीची घोषणा

भांडुपमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! २० लाखांचा गुटखा पानमसाला जप्त, नऊ आरोपींना अटक; पाच वाहने जप्त

SCROLL FOR NEXT