Amol Kolhe Sakal
पुणे

कोरोनाच्या नियंत्रणासाठी अठरा वर्षांवरील सर्वांचं लसीकरण हाच पर्याय - अमोल कोल्हे

कोरोनाची दुसरी लाट भयंकर आहे. कडक निर्बंध लावून व नियमांचे पालन करून आपण त्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत.

सकाळ वृत्तसेवा

वाघोली - कोरोनाची दुसरी लाट भयंकर आहे. कडक निर्बंध लावून व नियमांचे पालन करून आपण त्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत. तरी शेवटी 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण हाच त्यावर शेवटचा पर्याय आहे, अशी भूमिका शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी मांडली. कोल्हे यांनी शनिवारी वाघोली कोविड केअर सेंटरला भेट दिली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार अशोक पवार, सरपंच वसुंधरा उबाळे, रामदास दाभाडे, शिवदास उबाळे, तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, बाळासाहेब सातव, गणेश सातव आदी उपस्थित होते.

कोल्हे म्हणाले, "कोरोनाची दुसरी लाट भयंकर आहे. कडक निर्बंध लावून व नियमांचे पालन करून त्यावर आपण नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत. तरी शेवटी 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण हाच त्यावर पर्याय आहे. महिनाभरात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढली आहे. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येऊ लागला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारलाही जाग आली आहे. रशियाच्या स्पुटनिक लसीच्या वापरला तसेच हाफकीनला लस निर्मितीला आता केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे 'देर आये दुरुस्त आये' असंच म्हणावं लागेल. अन्य परदेशी कंपन्यांच्या लसींनाही वापरासाठी लवकरच परवानगी दिली जाईल."

रेमडेसिव्हीरचा अतिवापर होत असल्यानेच तुटवडा निर्माण झाला आहे. याबाबत आपण डॉक्टरांमध्ये जनजागृती करीत आहोत. रेमेडेसिव्हीर रुग्णांसाठी फायद्याचे ठरत असले तरी त्याच्या वापराबाबत धोरण आहे. त्याचा सरास वापर टाळाला जावा यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे व डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी रेमेडेसिव्हीर तयार करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेतली आहे. या लाटेत ऑक्सिजन व आयसीयू बेडची जास्त गरज भासत असून ते जिल्ह्यात कसे वाढवता येतील यासाठी सतत प्रत्यन सुरू आहेत.

आपलाच हलगर्जीपणा भोवला

मधल्या काळात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आपण मास्क काही काळ बाजूला ठेवले. सार्वजनिक कार्यक्रमही दणक्यात करू लागलो. हॉटेलिंगही मोठ्या प्रमाणात वाढले. या हलगर्जीपणामुळेच कोरोना झपाट्याने वाढला. दुसऱ्या लाटेत बधितांमध्ये तरुण व मध्यमवर्गीयांचे प्रमाण अधिक आहे. अशी चूक पुन्हा करून चालणार नाही. यावेळी कोल्हे यांनी लसीकरण केंद्राला भेट देऊन लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. तसेच लस घेतली तरी मास्क वापरा असा सल्लाही दिला.

ऑक्सिजन बेड सुरु करण्यावर चर्चा

वाघोलीतील बी. जे. एस. कोविड केअर सेंटरमध्ये 10 ऑक्सिजन बेड सुरू करण्याबाबत खासदार कोल्हे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी चर्चा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT