पुणे

पुणे : ज्ञानोबांच्या ओव्यांची रागांमधून अभिव्यक्ती (व्हिडिओ)

संतोष शाळिग्राम

पुणे : जीवनाचं सार तत्त्वज्ञानाच्या रूपात मांडून जगाला पसायदान देणारे संत ज्ञानेश्‍वर महाराज... पर्यावरण असो की अहिंसा यांवरही ओवीद्वारे भाष्य करणारे माउलींचे हे काव्य मराठीजनांच्या मुखी यावे म्हणून पुण्यातील पिता-पुत्रांनी त्याला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि पाश्‍चात्य संगीताचा साज चढवत "गीत ज्ञानेश्‍वरी' तयार केली आहे. 

पुण्यातील "सी-डॅक' संस्थेतील वरिष्ठ संचालक डॉ. दिनेश कात्रे आणि त्यांचा मुलगा परितोष यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. ज्ञानेश्‍वरीमध्ये नवरसांची अनुभूती होते. प्रत्येक ओवीतून त्याचा भावाविष्कार अनुभवता येतो. त्यालाच साजेसे संगीत त्यांनी बांधले आहे. त्यासाठी शास्त्रीय संगीतातील यमन, बिहाग, मल्हार, रागेश्री, हमीर, भिन्न षड्‌ज, ललित अशा विविध रागांचा आधार घेऊन ओव्या संगीतबद्ध केल्या आहेत.रागदारीचा वापर आणि संगीतरचनेतील ठहराव यामुळे त्यातील भावार्थ अधिक प्रभावी होतात. या रचनांमध्ये वेग नाही, तर मनातील कल्लोळ शमविणारी शांतता जाणवते.

या गीत ज्ञानेश्‍वरीबद्दल डॉ. कात्रे सांगतात की, काही वर्षांपूर्वी "सी-डॅक'ने ज्ञानेश्‍वरी मल्टिमीडियाच्या रूपात आणण्याचा उपक्रम हाती घेतला होता. डॉ. विजय भटकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. आळंदीचे किसन महाराज साखरे या कामी आम्हाला सहाय्य करीत होते. ते काम पूर्ण झाल्यानंतर काही वर्षांनी मला प्रत्येक ओवीवर सांगीतिक काम करण्याची इच्छा निर्माण झाली आणि काम सुरू झाले. प्रत्येक ओवीत एक भाव आहे. तो ज्या रागातून अभिव्यक्त होऊ शकेल, याचा विचार करून काव्याची बांधणी रागांमध्ये केली आहे. कारण हे रागही असंख्य वर्षे जुने आहेत.'' 

ज्ञानेश्‍वरांच्या ओव्यांमध्ये काव्य आणि तत्त्वज्ञानदेखील आहे. समाजाकडून त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. पण महाकाव्य लिहूनही त्यात एकदाही त्यांनी दु:खोद्‌गार काढलेले नाहीत. मन, वृक्ष, अहिंसा अशा असंख्य गोष्टींवर त्यांनी ओवीतून दृष्टांत दिलेले आहेत, असेही कात्रे यांनी सांगितले. ओव्यांचा गोडवा अधिक वाढविण्यासाठी पाश्‍चात्य संगीतातील सिंफनीचाही आधार त्यांनी घेतला आहे. 

गीत ज्ञानेश्‍वरीतील फ्युजनबाबत परितोष म्हणतो, ""पाशात्य संगीतामध्ये स्वरत्रयींचा वापर केला जातो. तो आणि भारतीय राग संगीतातील सुरावटी यांचा संयोग आम्ही साधला आहे.'' 

संकेतस्थळावरही संगीतबद्ध ओव्या उपलब्ध

ज्ञानेश्‍वरांच्या दहा हजार ओव्या आहेत. त्यातील तीस ओव्या त्यांनी आतापर्यंत संगीतबद्ध केल्या आहेत. आणखी 70 ओव्या संगीतबद्ध करण्याचा त्यांचा संकल्प आहे. ज्ञानेश्‍वरी अधिकाधिक लोकांपर्यंत नेण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी फेसबुकवर "गीत ज्ञानेश्‍वरी' हे पेज तयार केले आहे. तसेच www.geetdnyaneshwari.in हे संकेतस्थळही आहे. त्यावर संगीतबद्ध ओव्या सर्वांसाठी खुल्या केल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai High Court : पत्नी तुमच्या चाकरीसाठी नाही, जेवण न बनवणे, सफाई न करणे क्रूरता नाही; उच्च न्यायालयाने पतीला फटकारले

Pandharpur Town Project: वारकऱ्यांची खड्डे, चिखलातून होणार मुक्तता; महामार्ग प्राधिकरणाकडून ‘पंढरपूर टाउन’ प्रकल्पाला गती, नेमकं कस असेल रस्त्याचे स्वरूप?

‘एचएसआरपी’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर १ जुलैपासून कारवाई! वाहनांचे हस्तांतरण, कर्जाचा बोजा चढविणे, पुनर्नोंदणी, परवाना नुतनीकरण होणारच नाही, वाचा...

Satara Crime: जावळी तालुक्यात खळबळ! मजुरीच्या वादातून ५७ वर्षीय व्यक्तीची हत्या; आठ आरोपींना अटक

मोठी बातमी! महिलांच्या नावे घर खरेदीवेळी मुद्रांक शुल्कात १ टक्का सूट; बांधकाम व्यावसायिकांप्रमाणे राज्यात कोणत्याही जिल्ह्यात प्रॉपर्टीची खरेदी-विक्री

SCROLL FOR NEXT