Ghubad
Ghubad 
पुणे

चला पिंगोरीत घुबड महोत्सवाला

किशोर कुदळे

वाल्हे (पुणे) : घुबडाबद्दल असलेली भीती, अंधश्रद्धा आणि जादुटोण्यासाठी होणाऱ्या तस्करीमुळे देशात दरवर्षी जवळपास 78 हजार घुबडांची हत्या होते. त्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती होण्यासाठी इला फाउंडेशनतर्फे दुसरा "उलुक' अर्थात घुबड महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. घुबडांची निसर्ग साखळीत असलेली भूमिका नाटिका, नृत्य, वक्तृत्व, कवितांसह चित्र आणि वस्तूंच्या प्रदर्शनातून उलगडणार आहे.

पुरंदर तालुक्‍यातील पिंगोरी येथे येत्या 3 आणि 4 डिसेंबर रोजी निसर्गाच्या सानिध्यात महोत्सव होणार आहे. यासाठी सोळा देशांतील शास्त्रज्ञ सहभागी होणार असल्याची माहिती इला फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश पांडे यांनी दिली. घुबडांबद्दल अनेक गैरसमज आहेत. शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या घुबड हा निसर्गचक्रातला महत्त्वाचा घटक असला तरी अंधश्रद्धेमुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर मारले जाते.
निसर्गातील या महत्त्वाच्या घटकाचे अस्तित्व संकटात येऊ लागले आहे. घुबडाला पाहिले तर दिवस अशुभ असतो, असेही मानले जाते. तर काही ठिकाणी त्याची हत्या करून त्याचे रक्त व मांसाचे सेवन केले जाते. विविध कारणांमुळे वारंवार दुर्लक्षित राहिलेल्या या पक्ष्याच्या संरक्षण व संवर्धनासाठी जगजागृती व्हावी या उद्देशाने गतवर्षापासून पिंगोरी (ता. पुरंदर) येथे घुबडांसाठी दुसरा उलुक महोत्सव आयोजित केला जात असल्याचे डॉ. पांडे यांनी सांगितले. याप्रसंगी डॉ. सुरुची पांडे, राहुल लोणकर, राजकुमार पवार उपस्थित होते.
या दोन दिवसीय महोत्सवामध्ये राज्याच्या विविध भागांतील जवळपास दीडशे शाळा, निसर्ग-पशुप्रेमी यांच्यासह सोळा देशातील अभ्यासक सहभागी होणार आहे.

घुबडांची निसर्गातील भूमिका मांडणारी गाणी, व्याख्याने, पथनाट्यासह यामध्ये भारतातील मुलांनी काढलेली चित्रे, पोस्टर, ग्रीटिंग, मास्क, ओरिगामी, विणकाम, भरतकाम, शिल्प, मेहंदी, रांगोळी, वादन, नृत्य, नाटुकले, कविता आदींचे सादरीकरण केले जाणार आहे. या बरोबरच घुबडावरील विविध पुस्तके, फिल्म, ज्वेलरी तसेच खाऊचे स्टॉल उभारण्यात येणार असल्याचे डॉ. सुरुची पांडे यांनी सांगितले.

या महोत्सवाचा भाग म्हणून वर्षभरामध्ये जेजुरी परिसरामधील शाळांमध्ये पॉवर पॉइंटच्या माध्यमातून घुबडांविषयी माहिती देण्याचा कार्यक्रम सुरू असून या महोत्सवामध्ये जास्तीत जास्त शाळांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही राजकुमार पवार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT