P B Sawant Passed Away Elgar Parishad President 
पुणे

न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे पुण्यात निधन

सकाळ डिजिटल टीम

पुणे : माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत (वय 91) यांचे आज, पुण्यात निधन झाले. गेल्या एक महिन्यापासून ते आजारी होते. आज, निवासस्थानी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या (मंगळवार, 16 फेब्रुवारी) पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

(सविस्तर वृत्त थोड्या वेळात)

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोण होते पी. बी. सावंत?
पी. बी. सावंत बॉम्बे युनिव्हर्सिटीतून एलएलबीची डिग्री घेतली होती. सुरवातीला मुंबई हायकोर्टात वकीली केल्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टातही वकीली केली होती. त्यानंतर 1973 रोजी ते मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश झाले. त्यानंतर 1989 ला ते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश बनले. 1995 साली निवृत्त झाल्यानंतर ते सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन सहभागी राहिले. ते वर्ल्ड प्रेस कौन्सिल (लंडन) आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष राहिले होते. देश बचाव आघाडी तसेच लोकशासन आंदोलन पार्टीचे ते संस्थापक होते.

  • 2002 च्या गुजरात दंगलीची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती व्ही. आर. कृष्णा अय्यर यांच्या अध्यक्षतेखालील समितीत काम केले.
  • 2003 मध्ये तत्कालीन महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक, पद्मसिंह पाटील, सुरेश जैन आणि विजयकुमार गावित यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या आयोगाचे पी. बी. सावंत अध्यक्ष होते.
  • Right to information'ची संकल्पना सर्वप्रथम अधिकृतरित्या मांडली होती.
  • एल्गार परिषदेचे ते अध्यक्ष होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT