पुणे

पुण्यासह मुंबईतील ५६७ कोटींची मालमत्ता जप्त ‘पीएसीएल’ गैरव्यवहारप्रकरणी कंपन्यांविरोधात ‘ईडी’ची कारवाई

CD

पुणे, ता. २२ : ‘पीएसीएल’ कंपनीशी संबंधित कोट्यवधी रुपयांच्या बेकायदा गुंतवणूक योजनेप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ‘मनी लाँडरिंग’ प्रतिबंधक कायद्यान्वये (पीएमएलए) ‘ईडी’च्या दिल्ली विभागीय कार्यालयाने आरोपी प्रतीक कुमार, त्यांचा मुलगा आणि संबंधित कंपन्यांच्या पुणे, मुंबई व रायगड येथील ५६७ कोटी ४५ लाख रुपयांच्या स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत.
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नवी दिल्ली येथे फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारे ‘ईडी’ने २०१६ मध्ये या प्रकरणाचा तपास हाती घेतला होता. सीबीआयने या प्रकरणात ३३ आरोपींविरोधात आरोपपत्र आणि पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपींनी शेतजमिनीची विक्री व विकासाचे आमिष दाखवून देशभरातील लाखो सामान्य गुंतवणूकदारांकडून ‘कॅश डाउन पेमेंट’ आणि हप्त्यांच्या माध्यमातून ४८ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची बेकायदा वसुली केली होती. गुंतवणूकदारांकडून दिशाभूल करणारी कागदपत्रे व कुलमुखत्यारपत्रांवर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या; मात्र प्रत्यक्षात बहुतांश प्रकरणांत जमिनी न देता गुंतवणूकदारांचे सुमारे ४८ हजार कोटी रुपये हडप करण्यात आले. या आर्थिक गैरव्यवहारात आरोपी प्रतीक कुमार याच्याविरोधात २०२२ मध्ये पुरवणी फिर्याद दिली होती. विशेष न्यायालयाने याची दखल घेत प्रतीक कुमारविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.
पीएसीएल कंपनीने सर्वसामान्य गुंतवणूकदारांकडून घेतलेले पैसे इतरत्र वळवून या स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यामध्ये प्रतीक कुमार, त्याचा मुलगा अंश प्रतीक कुमार आणि त्यांच्या बीमिंग इन्फ्राडेव्हलपर्स प्रा. लि., गणराज प्रॉपर्टीज प्रा.लि. आणि ग्रीनफिल्ड इस्टेट्स लि. या कंपन्यांच्या नावावर असलेल्या ४८ स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.
या मालमत्तांचे सध्याचे बाजारमूल्य ५६७ कोटी ४५ लाख ५२ हजार रुपये इतके आहे. या कारवाईसह ‘ईडी’ने पीएसीएल प्रकरणात आतापर्यंत देश-विदेशातील सुमारे ३० हजार २३५ कोटी रुपयांच्या जंगम व स्थावर मालमत्तांवर टाच आणली आहे.
------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd T20: भारत न्यूझीलंडचा दुसरा टी-२० सामना कधी अन् कुठे पाहता येणार? LIVE Streaming, वेळ अन् TV चॅनेलची माहिती जाणून घ्या

Dengue Infection : डेंगीने आठ वर्षांच्या मुलीचा बळी; उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू

Latest Marathi News Live Update : CJP च्या आंदोलनाशी माझा संबंध नाही’; नेहा बोरा यांचा न्यायालयात दावा

Mumbai News : शिक्षक नियुक्तीच्या पारदर्शकतेवर न्यायालयाचा शिक्कामोर्तब; शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांचा निर्णय उच्च न्यायालयाकडून कायम

Vitamins Tips: कोणतं व्हिटॅमिन कधी घ्यावं? जाणून घ्या योग्य वेळ आणि महत्त्वाच्या गोष्टी!

SCROLL FOR NEXT