पुणे

‘पोलिस दादांचे गाव’ म्हणून पादीरवाडीची ओळख

CD

आळेफाटा, ता. १७ : जिद्द, कष्ट आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर डोंगराळ भागातील तरुणही मोठी स्वप्ने साकारू शकतात, याचा आदर्श जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पादीरवाडी या छोट्याशा वस्तीने निर्माण केला आहे. सुमारे बाराशे लोकवस्ती असलेल्या या गावातील तब्बल ४० तरुण-तरुणी महाराष्ट्राच्या विविध भागांत पोलिस दलात कार्यरत आहेत. यामुळे पादीरवाडीची ओळख आता ‘पोलिसदादांचे गाव’ अशी निर्माण झाली आहे.
अहिल्यानगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गालगतच्या वडगाव आनंद ग्रामपंचायतीच्या हद्दीत पादीरवाडी डोंगराच्या कुशीत वसलेली आहे. पूर्वी सातत्याने दुष्काळाचा सामना करणाऱ्या या गावातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह आजही मोलमजुरीवर अवलंबून आहे. प्रतिकूल परिस्थितीतही पालकांनी कष्ट करून मुलांना शिक्षण दिले. त्यातूनच अनेक युवकांनी पोलिस दलात जाण्याचे ध्येय उराशी बाळगले. या गावातून निशा चव्हाण (सहाय्यक पोलिस निरीक्षक), मीना वऱ्हाडी (पोलिस उपनिरीक्षक), अमोल गागरे (अध्यक्ष, नवी मुंबई पोलिस सहकारी पतपेढी), अपेक्षा गागरे, संध्या गागरे, सुनील मोरे, तुकाराम मोरे, प्रियंका पादीर, अभिषेक पादीर, दीपा चव्हाण यांच्यासह अनेक तरुण पोलिस दलात कार्यरत आहेत.
पोलिस दलात कार्यरत असलेले हे युवक सुट्टीसाठी गावात आल्यानंतर केवळ कुटुंबासोबत वेळ न घालवता गावातील तरुणांना एकत्र करतात. पोलिस भरतीची प्रक्रिया, मैदानी चाचणी, बुद्धिमत्ता चाचणी आणि अभ्यासाचे नियोजन याबाबत ते मार्गदर्शन करतात. काही वेळा स्वतः मैदानावर सराव घेऊन तरुणांकडून मेहनत करून घेतात. गावातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या यशामुळे इतर युवकांमध्येही पोलिस दलात जाण्याची प्रेरणा निर्माण झाली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असून, विविध क्रीडा प्रकारांतही ते पुढे असतात. त्यामुळे त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून संधीचा उपयोग करावा. पादीरवाडी तसेच मोरदरा परिसरातील जवळपास ४० जण विविध जिल्ह्यांत पोलिस दलात कार्यरत आहेत ही गावासह जुन्नर तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे.
- अमोल गागरे, अध्यक्ष, नवी मुंबई पोलिस सहकारी पतपेढी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना दिलासा; सशर्त जामीन मंजूर करताना न्यायालयाने काय घातली अट?

IND vs WI 5th T20I: चिन्नास्वामीवर Fire Alarm वाजला, भारतीय क्रिकेटपटूच्या फोनवर Emergency Alert अन्...; नेमकं काय घडलं?

Shivneri Kabaddi Tournament: अजिंक्य-साईच्या जोरावर रिजनल स्पोर्ट्स बोर्डाची तिसऱ्या फेरीत धडक, माटुंगा वर्कशॉपचा उडवला धुव्वा

Latest Marathi News Live Update : बुलडाण्यात सर्क्युलर रोडवर धावत्या बसला आग! युवकांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

यू-ट्युब पाहून मुलीचा गर्भपात करण्याचा प्रयत्न, नागपूरमधील धक्कादायक घटना; १८ वर्षीय आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT