Padvidhar election result 2020 
पुणे

MLC Election Results 2020: वाचाळवीरांना जबरदस्त चपराक; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

सकाळ ऑनलाईन टीम

पदवीधर निवडणुकीत महा विकास आघाडीला मिळालेला विजय हा वाचाळवीरांना जबरदस्त चपराक आहे, अशी प्रतिक्रिया उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी दिली. या निकालानंतर मुख्यमंत्र्यांसह आमची जबाबदारी आणखी वाढली आहे. पुढील निवडणुकाही एकत्रित लढण्याचा आम्ही प्रयत्न करु, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

पदवीधर निवडणुकीतील निकालानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तिन्ही पक्ष एकत्रित लढल्यामुळे पराभव स्वीकारावा लागला अशी प्रतिक्रिया दिली होती. मित्र आम्हाला सोडून गेला म्हणून ही परिस्थिती ओढवली, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. यावरही अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता.   

बिन कामाचा सल्ला देण्याचे काम काही लोक करत आहेत. पराभव मान्य करण्याची दानतही विरोधी पक्षात नाही. त्यांच्या जागी आम्ही असतो तर चिंतन करु अशी दिलदार प्रतिक्रिया दिली असती, असा टोला अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. सरकार स्थिर स्थावर झालेले आहे, असे म्हणत त्यांनी महा विकास आघाडी सरकारचा कारभार व्यवस्थित सुरु असल्याचेही भाष्य केले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT