चिंचवड, ता.१० ः वाढत्या शहरीकरणामुळे शेती आणि पारंपरिक सणांपासून नवी पिढी दूर जात असताना, चिंचवडेनगर परिसरातील पडवळ परिवाराने मात्र शेतीशी असलेली नाळ आजही घट्ट जपली आहे. रामचंद्र पडवळ, दामोदर पडवळ, राजेंद्र पडवळ आणि बाळासाहेब रामचंद्र पडवळ यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही बैलपोळा सण उत्साहात साजरा केला.
शेती व्यवसायासोबतच बैलांचे संगोपन करणाऱ्या या परिवाराने बदलत्या काळातही परंपरेची जोपासना केली आहे. शेतात राबणाऱ्या बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना सजवून, त्यांची पूजा करून बैलपोळा सण साजरा करतात.
‘शेतकरी असणे हा आमचा अभिमान!’ या भावनेतून पडवळ परिवाराने शेती आणि पशुधनाचे महत्त्व जपले आहे. बैलांच्या कष्टांमुळे शेतात पीक उभे राहते आणि अन्नधान्याची निर्मिती होते. त्यामुळे या मुक्या जीवांचा सन्मान करणे, त्यांच्या योगदानाची जाणीव ठेवणे आणि पुढील पिढीला शेतीच्या कष्टांचे महत्त्व समजावून सांगणे, हाच या सणामागील मुख्य उद्देश आहे.
मातीशी नाळ, कलेशी नाते
वाढत्या शहरीकरणात शेती परंपरा लोप पावत असताना, चिंचवडमधील ८० वर्षीय दामोदर बापूराव पडवळ यांनी शेती आणि बैलजोडीचा वारसा आजही जपला आहे. गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ ते शेती व्यवसायात कार्यरत आहेत. शेतीची आवड जोपासतानाच नवीन पिढीतील त्यांचे पुतणे प्रतीक पडवळ हेही बैलजोडीचे संगोपन करून परंपरेचा वारसा पुढे नेत आहेत. जुन्या पिढीचा अनुभव आणि नव्या पिढीची परंपरेप्रति निष्ठा यांचा सुंदर संगम पडवळ परिवारात पाहायला मिळतो.
गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ मी शेती व्यवसाय करत असून, बैलांचे संगोपनही करतो. वाढत्या शहरीकरणामुळे शेती कमी होत असली तरी वयाच्या ८० व्या वर्षीही शेती करणे हे माझ्यासाठी केवळ आव्हान नसून जीवनाचा अविभाज्य भाग तसेच शेतीची आवड आहे. शेती, बैलजोडी आणि आपली परंपरा जपण्यातच मला खरा आनंद मिळतो.
- दामोदर पडवळ, शेतकरी चिंचवडेनगर
चिंचवडेनगर ः येथे बैलपोळ्यानिमित्त सजविलेल्या बैलांसोबत दामोदर पडवळ व कुटुंबीय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.