पुणे

‘पेड डिग्री’वाल्यांनी शेतकऱ्यांच्या पोरांना डिवचू नये

CD

‘पेड डिग्री’वाल्यांनी शेतकऱ्यांच्या पोरांना डिवचू नये ः साजन पाचपुते

श्रीगोंदे, ता. ६ ः लंडनहून डिग्री घेऊन आल्याचा टेंभा मिरवायचा आणि शेतकऱ्यांच्या पोरांना अर्बन नक्षली म्हणायचे, हे खपवून घेतले जाणार नाही. विक्रम पाचपुते यांची डिग्री विकत घेतल्याचा माझा आरोप आहे. अशा ‘पेड डिग्री’वाल्यांनी शेतकऱ्यांच्या पोरांना डिवचू नये, असा घणाघात शिवसेना (ठाकरे गट) उपनेते तथा काष्टीचे सरपंच साजन पाचपुते यांनी आमदार विक्रम पाचपुते यांच्यावर केला.

साजन पाचपुते म्हणाले, की शेतकरी कुटुंबातील मुले दिवस-रात्र अभ्यास करून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्यांच्या हातात पुस्तके आहेत, दगड नाहीत. त्यांच्या आंदोलनाला ‘अर्बन नक्षली’ ठरविण्यापेक्षा त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या. शेतकऱ्यांच्या पोरांनी शिक्षण घेऊन पुढे जाण्याची धडपड केली, म्हणून त्यांना देशद्रोही किंवा अर्बन नक्षली ठरविण्याचा अधिकार कुणालाही नाही. आमदारकीची पहिली टर्म आहे. मतदारसंघातील प्रश्नांची यादी मोठी आहे. औद्योगिक वसाहत, पाणी आणि रस्त्यांचे प्रश्न आधी सोडवा.

.................

पवार नसते तर आपण कुठे असतो?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे आमच्या पाचपुते कुटुंबावर खूप उपकार आहेत. त्यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना राजकीय पाठबळ देत राज्याच्या राजकारणात मोठ्या संधी दिल्या. त्यामुळेच आज विक्रम पाचपुते आमदार आहेत. पवार नसते तर आज आपण कुठे असतो, हा प्रश्न विक्रम यांनी आधी आपल्या वडिलांना विचारावा आणि त्यानंतर पवारांवर बोलण्याचे धारिष्ट्य दाखवावे, असेही साजन पाचपुते यांनी सुनावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satana News : दुष्काळ जाहीर; मात्र शेतकरी डिजिटल चक्रव्यूहात, सातबारा अन् ‘फार्मर आयडी’साठी संकेतस्थळे ठप्प

SME Growth Fund : लघु आणि मध्यम उद्योगांसाठी १० हजार कोटींचा 'एसएमई ग्रोथ फंड'; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Marathi News Live Updates: पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’चा अहवाल

Sanchar Saathi Milestone : सायबर फसवणुकीविरोधात नागरिक बनले ‘योद्धा’! ‘संचार साथी’ पोर्टलने ओलांडला ३० कोटी भेटींचा टप्पा

Mumbai Police: 2 हजार 850 बनावट अ‍ॅप्स अन् 9 हजार 673 नागरिकांची 150 कोटींची फसवणूक; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

SCROLL FOR NEXT