pair of Gaur animal in Rajiv Gandhi Zoological Park & Wildlife Research Katraj pune sakal
पुणे

कात्रजच्या प्राणिसंग्रहालयात तरस आणि गव्याची जोडी दाखल

१६५० किमीचा प्रवास करत केरळमधील तिरुवनंतपुरमधील त्रिवेंद्रम प्राणी संग्रहालयातून या दोन जोड्या पुण्यात

अशोक गव्हाणे

कात्रज : नॅशनल झू ऑथॉरिटी आणि महाराष्ट्र राज्य वन खात्याने पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात (Rajiv Gandhi Zoological Park & Wildlife Research, Katraj) तरस आणि गव्याची जोडी आणण्यासाठी मान्यता दिली होती. त्यानंतर १६५० किमीचा प्रवास करत केरळमधील तिरुवनंतपुरमधील त्रिवेंद्रम प्राणी संग्रहालयातून या दोन जोड्या पुण्यात दाखल झाल्या आहेत.पहिल्यांदाच तरसाची जोडी राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात दाखल झाली आहे. तत्पूर्वी, खंदकाचे काम सुरु असल्याने तरसाच्या जोडीला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्या खंदकात सोडण्यात येणार आहे. त्यानंतर तरस पर्यटकांना पाहता येईल.

गव्याची जोडी मात्र पर्यटकांना पाहण्यास उपलब्ध आहे. प्राणिसंग्रहालयात पूर्वीपासूनच एक गवा पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध होता. या जोडीसह आता एकूण गव्यांची संख्या तीन झाली आहे. गव्याच्या जोडीचे नाव किट्टू आणि अविका असून तरसाचेही लवकरच नामकरण करण्यात येणार आहे. त्रिवेंद्रम प्राणिसंग्रहालय ते पुणे हा कात्रज प्राणिसंग्रहालयाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा प्राणी वाहतूक दौरा होता. ही सर्व अदलाबदलीची आणि वाहतूकीची प्रक्रिया प्राणिसंग्रहालयाच्या पथकानेच केली आहे. शहरातील पर्यटकांसह आजूबाजूंच्या नागरिकांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. कात्रजच्या प्राणीसंग्रहालयात एक-एक करत अनेक प्राणी आणण्यात येत आहेत. यावर्षी, रानमांजर, वाघाटी आणि शेकरू आणल्यानंतर आता प्राणीसंग्रहालयात तरस हा नवीन प्राणी दाखल झाल्याची माहिती संग्रहालय प्रशासनाने दिली आहे.

प्राणिसंग्रहालय अद्यावत करत पर्यटकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. येणाऱ्या काळातही पर्यटकांसाठी सहज पाहण्यासाठी न उपलब्ध होणारे विविध प्राणी आणण्याचा महापालिकेचा मानस आहे.

- विलास कानडे, अतिरिक्त आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट कायम; बुधवारी सर्वाधिक तापमान चंद्रपुरात; अकोला, अमरावती किती?

बांगलादेशचा शकिब अल हसन मुंबईत आला; T20 World Cup मधून माघार घेणाऱ्या सरकारच्या निर्णयावर संतापला, म्हणाला...

शाळांना विद्यार्थ्यांच्या रिझल्टची घाई, मुंबईतील अनेक शाळांचे निकाल जाहीर, गुणपत्रिकाचेही वाटप; शिक्षण विभागाचे नियोजन फेल?

Karnataka Congress Crisis : कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! 15 मे रोजी डी. के. शिवकुमार घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ? आमदाराच्या दाव्याने खळबळ

Latest Marathi News Live Update: बंगळुरूत 'बोरिंग आणि लेडी कर्झन हॉस्पिटल'जवळ मोठी दुर्घटना, मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत

SCROLL FOR NEXT