JYK26B13901
पैठण : येथील मोक्षघाटावर शनिवारी सिंहस्थ पर्वास ध्वजवंदनाद्वारे प्रारंभ करताना आमदार विलास भुमरे, वर्षा भुमरे, नगराध्यक्षा विद्या कावसानकर यांच्यासह संत-महंत अन् मान्यवर.
पैठणमध्ये सिंहस्थ ध्वजसोहळा उत्साहात
पैठण (जि. छत्रपती संभाजीनगर), ता. ३१ : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र पैठण नगरीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीला भक्तिमय वातावरणात सुरवात झाली. शनिवारी (ता. ३१) गोदावरी नदीच्या तीरावरील मोक्षघाट येथे ३१ फूट उंच स्तंभावर १५ फुटांचा भगवा ध्वज फडकवून सिंहस्थ पर्वाची विधिवत नांदी करण्यात आली.
पैठणमधील स्थानिक कारागिरांनी तयार केलेल्या या विशेष ध्वजावर मध्यभागी सिंह, तर एका बाजूला सूर्य व दुसऱ्या बाजूला चंद्राचे चित्र रेखाटले आहे. पुरोहित कमलाकर शिवपुरी, दत्तागुरू पोहेकर व सहकाऱ्यांच्या वेदमंत्रोच्चारात दुपारी १२ वाजून २ मिनिटांच्या मुहूर्तावर हा धार्मिक विधी झाला. आमदार विलास भुमरे अन् वर्षा भुमरे, नगराध्यक्षा विद्या कावसानकर, तहसीलदार ज्योती पवार आदी मान्यवरांसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोक्षघाट परिसरात भव्य मंडप उभारला होता. ध्वजवंदनप्रसंगी भाविकांनी केलेल्या जयघोषाने गोदाकाठ दुमदुमून गेला.
चौकट
शाही स्नानांचे आयोजन
पैठण येथे होणारी तीनही शाही स्नाने नाशिकच्या धर्तीवर मोठ्या स्वरूपात आयोजित करण्याचा मानस आहे. यासाठी देशभरातील नामवंत संत-महंत आणि साधू-महात्म्यांना निमंत्रित केले जाईल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन समिती, प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून काटेकोर नियोजन केले जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.