पुणे

आंदोलनापुढे पाकिस्तान सरकार नरमले

CD

इस्लामाबाद, ता. ९ (पीटीआय) : पाकव्याप्त काश्मीरमध्ये मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज गट) पक्षाने आपली भूमिका मवाळ केली आहे. या भागातील ९९ टक्के आंदोलक हे ‘देशभक्त’ असल्याचे विधान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान सरकारने या आंदोलकांमध्ये ‘तेहरीक-ए-तालिबान’ या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचा दावा केला होता.
पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये नागरिकांवर प्रचंड अत्याचार होत असून सुरक्षा सैनिकांकडून दडपशाही केली जात असल्याचा आरोप करत नागरिकांनी आंदोलन सुरू केले आहे. व्याप्त काश्‍मीरवर पाकिस्तानने बळजबरी ताबा मिळविला असल्याचा दावाही आंदोलक करत आहेत. हे आंदोलन दडपण्यासाठी पाकिस्तानने बराच प्रयत्न करूनही आंदोलक बधत नसल्याने पाकिस्तान सरकारने आता नरमाईची भूमिका स्वीकारली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील ४५ जागांसाठी सुरू असलेल्या तथाकथित निवडणुकीत शरीफ यांच्या पक्षाने आतापर्यंत २५ जागा जिंकल्या आहेत. मात्र, या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि फेरफार झाल्याचे आरोप आहे.
‘जॉइंट अवामी ॲक्शन कमिटी’(जेएएसी) या आंदोलनाचे नेतृत्व करत असून या संघटनेत विद्यार्थी, व्यापारी, वकील आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. निर्वासितांसाठी असलेल्या १२ वादग्रस्त जागा रद्द करण्याची या संघटनेची मुख्य मागणी आहे. या जागांचा वापर करून पाकिस्तानचे लष्करी प्रशासन आपल्या मर्जीतील नेता लादते, असा आंदोलकांचा आरोप आहे. या संघटनेच्या सदस्यांशी लवकरच चर्चा केली जाईल, असे सनाउल्लाह यांनी स्पष्ट केले आहे. या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, सोमवारी (ता. १०) चार जागांसाठी मतदान होणार असून सात मतदारसंघांतील निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आंदोलकांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन सनाउल्लाह यांनी दिले आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भारताचा अविभाज्य भाग असून पाकिस्तानने या भागावर बेकायदा कब्जा केला आहे, अशी भारताची ठाम भूमिका आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SLC XI Warm up: टीम इंडियाने सहज जिंकला सराव सामना! आता सुरू होणार खरी परीक्षा, पाहा कसोटी मालिकेचे वेळापत्रक

फोटो काढायला आली अन् Kiss करून गेली! चाहतीचं भयंकर कृत्य पाहून घाबरली अभिनेत्री, Viral Video

Bhokardan Accident: भोकरदन-वालसावंगी मार्गावरील धोकादायक विहिरी ठरताहेत मृत्यूचा सापळा; कार विहिरीत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

Ambad Accident: खंडोबाची वारी मागण्यासाठी आले अन् काळाचा घाला; अंबडमध्ये टेम्पोच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला; गाडीवर दगड, चिखल आणि चपला फेकल्या, 'चोर-चोर'च्या घोषणा

SCROLL FOR NEXT