PGR26B03397
पांगरी (ता. बार्शी) : अष्टे डू मर्दानी खेळात प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर पलक वाघे हिचा सत्कार करताना मान्यवर.
पांगरीतील वाघेची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
पांगरी : बार्शी तालुक्यातील पांगरी येथील शोभाताई सोपल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनी पलक राजेंद्र वाघे हिने मर्दानी खेळात प्रथम क्रमांक मिळवला. या यशानंतर तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भंडारा यांच्या अंतर्गत आयोजित अष्टे डू मर्दानी आखाडा राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धे’मध्ये पलकने अंडर-१४ वयोगटातील मर्दानी कला या प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत अव्वल स्थान मिळवले. या यशामुळे शाळेचे नाव उज्ज्वल झाले असून ती आता आंतरराज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्या यशाबद्दल शाळेचे संस्थापक विनायक गरड, मुख्याध्यापिका श्रीमती चांदणे तसेच शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.