पुणे

पालघर रुग्णालय हिंसाचारप्रकरण

CD

रोहित गावितसह २२ जणांना
उद्यापर्यंत पोलिस कोठडी

पालघर रुग्णालय हिंसाचारप्रकरणी न्यायालयाचे आदेश

पालघर, ता. १४ (पीटीआय) : पालघरमधील रुग्णालय हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या २२ जणांना स्थानिक न्यायालयाने बुधवार (ता. १६) पोलिस कोठडी सुनावली. आमदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित आणि शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे.

न्याय दंडाधिकारी योगेश गजभिये यांनी रविवारी रात्री उशिरा दिलेल्या आदेशानुसार या सर्वांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. ५ आणि ६ सप्टेंबरच्या मध्यरात्री काही जखमी ‘गोविंदा’ उपचारासाठी दाखल असलेल्या पालघर येथील रिलीफ रुग्णालयात शिवसेनेचे काही कार्यकर्ते घुसले होते. रुग्णालयाकडून अवाजवी शुल्क आकारले जात असल्याचा आरोप करत त्यांनी रुग्णालयाच्या मालमत्तेची तोडफोड केली, डॉक्टरांना धमकावले, कर्मचाऱ्यांना मारहाण केली आणि अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या एका जखमीला जबरदस्तीने बाहेर नेले, असा आरोप आहे.

या प्रकरणी दंगल, मारहाण, जिवे मारण्याची धमकी, अनधिकृत प्रवेश, बेकायदा जमाव आणि अन्य गुन्ह्यांखाली भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती अन् वैद्यकीय सेवा संस्था (हिंसाचार व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी रुग्णालयातील ‘सीसीटीव्ही’ चित्रणाच्या आधारे २२ आरोपींची ओळख पटवली. शिवसेनेचे पालघर शहरप्रमुख राहुल घरत यांना ७ सप्टेंबरला अटक करण्यात आली होती. त्यानंतर ११ सप्टेंबरला रोहित गावित आणि दहीहंडीतल १२ गोविंदांना यांना अटक झाली. कुंदन सांखे आणि अन्य आरोपींनी रविवारी पोलिसांसमोर शरणागती पत्करली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

Pune Negligent Driving: सोरतापवाडी फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Maratha Reservation : सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार

Pune Civic Row: स-यादीतून बाकडे, पिशव्या खरेदीला मनसेचा कडवा विरोध; महापालिका आयुक्तांकडे निवेदन

SCROLL FOR NEXT