insdapur.jpg 
पुणे

पालखी सोहळा अध्यात्मिक पर्वणी : आमदार दत्तात्रय भरणे

डॉ. संदेश शहा

इंदापूर : ''इंदापूर तालुक्यातून पालखी सोहळ्याचे किमान ७ ते ८ लाख वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपूरला जातात. पालखी सोहळे तालुक्यास अध्यात्मिक पर्वणी असून त्याचा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी शासन, प्रशासन तसेच नागरिकांनी वारकऱ्यांना मुलभुत सुविधा पुरवण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे.'' असे आवाहन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.

इंदापूर पंचायत समितीच्या लोकनेते शंकरराव पाटील सभागृहात पालखी सोहळा नियोजन बैठकीत आमदार भरणे अध्यक्षीय मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी तहसिलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, पोलीस निरीक्षक मधुकर पवार, नगराध्यक्षा अंकिता शहा, हनुमंत बंडगर, महारूद्र पाटील, सतिश पांढरे व बाळासाहेब काळे, मुकूंद शहा, संजीव लोंढे उपस्थित होते. 

काँग्रेस नगरपरिषद गट नेते कैलास कदम यांनी पालखी तळ व्यवस्थापनासाठी ५० लाख व पाणी टंचाई परिस्थितीत नगरपरिषदेस चारी वाढविण्यासाठी १० लाख रूपये, नगरसेवक अनिकेत वाघ यांनी उपजिल्हारूग्णालयात मनुष्यबळ तसेच औषध साठा वाढविण्यासाठी तर नगरसेवक श्रीधर बाब्रस यांनी वारकरी सर्वत्र उतरत असल्याने शहरातील सर्व रस्त्यांची दुरूस्ती करण्याची मागणी केली. यावेळी भरणे म्हणाले, ''भीषण दुष्काळी परिस्थितीत लाखो वारकरी तालुक्यात येणार आहेत. आपल्याकडे पाणी टंचाई असताना देखील 'अतिथी देवो भव' या तत्वाने सर्व वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी आपणास मिळाली आहे. वारकरी आनंदी राहतील असे काम सर्वांनी करणे गरजेचे आहे. सोहळा यशस्वितेसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत,'' असे आवाहन त्यांनी केले.
  

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल राऊत यांच्यासह बेलवाडी, निमगाव केतकी, सराटी, निरवांगी, भिगवण गावच्या प्रतिनिधींनी पालखी कामासंदर्भात कैफीयती सादर केल्या. यावेळी रघुनाथ गोफणे, मोहन सुळ, डॉ. एकनाथ चंदनशिवे, रामनिवास झंवर, विनायक गुळवे, डॉ. सुरेखा पोळ यांनी आपल्या विभागाचा आढावा सादर केला. यावेळी पालखी मुक्कामी ७०० शौचालये, पाण्यासाठी ३०० टँकर्स, मुक्काम ठिकाणी २४ तास वीज, बेलवाडी व इंदापूर रिंगण सोहळा सुविधा, केरोसिन व गॅस, प्लॅस्टीक व कचरा निर्मुलन,पाणी निर्जंतुकीकरण, ६ प्राथमिक आरोग्य केंद्र व २ ग्रामिण रूग्णालयात पुरेसे डॉक्टर, कर्मचारी व औषधे आदींचे नियोजन झाले. 

इंदापूर उपजिल्हारूग्णालयाचे वैद्यकियअधिक्षक तथा निमगाव केतकी ग्रामिण रूग्णालयाचे प्रमुख डॉ. राजेश मोरे हे पुर्वसुचना देवून सुध्दा यावेळी गैरहजर राहिले. त्यांच्या कार्यपध्दतीबद्दल सर्वाधिक तक्रारी आहेत. विशेष म्हणजे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम निमगाव केतकीस असतो. त्यामुळे डॉ. मोरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी नानासाहेब शेंडे यांनी केली. त्याची दखल आमदार भरणे यांनी घेवून तहसिलदार मेटकरी यांना सुस्पष्ट अहवाल पाठविण्याची सुचना केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT