Palkhi sohala Sant Shri Dnaneshwar Maharaj Sant Tukaram Maharaj in hadapsar pune
Palkhi sohala Sant Shri Dnaneshwar Maharaj Sant Tukaram Maharaj in hadapsar pune sakal
पुणे

Palkhi Sohala : पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी हडपसर सज्ज; असे असेल पालिका व पोलीस प्रशासनाचे नियोजन

कृष्णकांत कोबल

हडपसर : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा गुरुवारी (ता. १४) हडपसर येथून पुढे ग्रामीण हद्दीत मार्गस्थ होत आहे. शहरातील अखेरचा टप्पा असल्यामुळे याठिकाणी दर्शनासाठी मोठ्याप्रमाणात गर्दी होत असते. या सोहळ्याचे स्वागत व सोयीसुविधा पुरविण्यासाठी पालिका व पोलीस प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे.

पालिका व पोलीस प्रशासनाकडून पुणे-सोलापूर या संत तुकाराम महाराज व पुणे-सासवड या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याशिवाय विविध संस्था, मंडळे, आस्थापना व राजकीय पक्षांकडूनही देण्यात येणाऱ्या सेवांचे नियोजने सुरू आहेत.

पालिकेकडून येथील विसावा स्थळांची डागडुजी, रंगरंगोटी, दिवाबत्ती व सुशोभीकरण करण्यात येत आहे. वारकऱ्यांसाठी स्वच्छतागृहे, पाणी, आरोग्यसुविधा, मार्गांची डागडुजी व साफसफाई करण्यात आली आहे.

पोलिसांनीही मार्गाची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेची तयारी केली आहे. विविध मंडळे, संस्था, संघटना, राजकीय पक्षांच्या वतीने अन्नदान, गरजेच्या वस्तू, आरोग्य सुविधा व स्वागतासाठी व्यासपीठे, मंडप उभारणीचे काम सुरू केले आहे.

"पालखीसोहळा स्वागताच्या दृष्टीने यापूर्वी घेतलेल्या नियोजन बैठकीनुसार सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. अधिकाऱ्यांशी वेळोवेळी समन्वय साधून नियोजन केले जात आहे. येणारे वारकरी व भाविकांची या काळात अधिकाधिक चांगली सेवा कशी देता येईल, याकडे प्रशासनासह स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांनीही लक्ष द्यावे,'

आमदार चेतन तुपे पाटील

पालिकेकडून पालखी सोहळ्यासाठी हडपसर येथे स्थापत्य विभागाकडून हडपसर - गाडीतळ, उरुळी देवाची, सासवड रोड व मांजरी फार्म अशा एकूण चार ठिकाणी विसावा ओट्याची डागडुजी, रंगरंगोटी,

मंडप उभारणी, रेलींग लावणे, आरोग्य विभागाकडून कै. आण्णासाहेब मगर, कै. सखाराम कोद्रे, कै. रोहण काळे व कै. दशरथ भानगिरे दवाखाना सकाळी ९ ते ५ या वेळेत वारकऱ्यांसाठी खुले राहणार आहेत. घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून पालखी मार्ग साफसफाईसाठी एकूण ८५९ सेवक चोवीस तास कार्यरत करणार आहेत.

कचरा संकलनासाठी २० ते २५ घंटागाड्या कार्यरत राहणार आहेत. २२९ मोबाईल शौचालय ठेवण्याचीही व्यवस्था करणेत येणार आहे. २७ कचरा कंटेनर किंवा निर्माल्य कलश ठेवण्याची व्यवस्था केली आहे. सध्या मार्गाची साफसफाई करून पावडर फवारणी केली जात आहे. वारकऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्याची छाटनी केली जात आहे.

भटकी जनावरे उचलून कोंडवाड्यात ठेवली जात आहेत. रस्त्यावरील खड्डे बुजवून राडारोडा काढण्यात येत आहे. टँकरने पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. दिंड्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी प्रकाश व्यवस्था, साफसफाई, औषध फवारणी केली जात असल्याचे हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर यांनी सांगितले.

"या वर्षी पालखीसाठीचा पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दोन्हीही पालख्यांसाठी मिळून येथे दोन पोलीस उपायुक्त, सहा सहाय्यक पोलीस आयुक्त, तेरा पोलीस निरिक्षक, पन्नास उपनिरीक्षक व सहाय्यक निरिक्षक, चारशे पन्नास पोलीस कर्मचारी याशिवाय होमगार्ड,

राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना व महाविद्यालयीन विद्यार्थी स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. पाच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, विविध पंचवीस इमारतींवरूनही लक्ष ठेवले जाणार आहे. मगरपट्टा सीटी, सीरम इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्याने आवश्यक ठिकाणी बॅरियर्स लावण्यात येणार आहेत.'

- अरविंद गोकुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: 48 तासांत मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यावर सुनावणी, कोर्टाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावून उत्तर मागितले

Gurucharan Singh: बेपत्ता झालेला गुरुचरण सिंग अखेर घरी परतला; म्हणाला, "मी धार्मिक प्रवासाला निघालो होतो..."

Stock Market: 20 मे रोजी मुंबईतील लोकसभा मतदानामुळे शेअर बाजार बंद राहणार का?

IPL 2024 MI vs LSG : मुंबई संघाच्या गोलंदाजीची दुर्दशा कायम;निकोलस पूरनच्या झंझावाती फलंदाजीमुळे लखनौच्या २१४ धावा

Latest Marathi News Live Update : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला बसची धडक 25 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT