पुणे

''पालवी अपना घर’च्या नूतन वास्तूचा आमदार समाधान आवताडे व प्रशांत परिचारक यांच्या हस्ते गृहप्रवेश

CD

PNE26W50985
पंढरपूर : ‘पालवी अपना घर’च्या गृहप्रवेश सोहळ्यात मार्गदर्शन करताना आमदार समाधान आवताडे. दुसऱ्या छायाचित्रात गृहप्रवेश प्रसंगी माजी आमदार प्रशांत परिचारक, मंगलताई शहा आदी.
---
‘पालवी अपना घर’मधून निराधारांना आधार
प्रशांत परिचारक; मान्यवरांच्या उपस्थितीत नूतन वास्तूचा गृहप्रवेश
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. १८ : पंढरपूर तीर्थक्षेत्र असल्याने चंद्रभागा नदीकाठ, घाट तसेच शहरातील विविध भागांत निराधार आणि मनोरुग्ण व्यक्तींना सोडून देण्याचे प्रमाण दुर्दैवाने मोठे आहे. अशा महिलांसाठी मायेचे आणि हक्काचे छत निर्माण करण्याचे अवघड कार्य पालवीच्या संस्थापिका मंगलताई शहा आणि डिंपल घाडगे यांनी यशस्वीपणे पेलले आहे, असे प्रतिपादन पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी केले.
प्रभा हिरा प्रतिष्ठान संचलित ‘पालवी’ संस्थेच्या वतीने मनोरुग्ण, निराधार आणि आधाराची गरज असलेल्या महिलांसाठी उभारण्यात आलेल्या ‘पालवी अपना घर’ या नूतन वास्तूचा गुरुवारी (ता. १७) आमदार समाधान आवताडे आणि प्रशांत परिचारक यांच्या हस्ते गृहप्रवेश झाला. यावेळी परिचारक बोलत होते.
श्री. परिचारक म्हणाले, आदरणीय बाबा आमटे यांच्या कुटुंबाप्रमाणे मंगलताई, त्यांची लेक डिंपल, जावई, मुलगा, सून, नातू, नातसून अशा संपूर्ण परिवाराने या सेवाकार्याला वाहून घेतले आहे. ही पंढरपूरसाठी अभिमानाची बाब आहे. ‘पालवी अपना घर’च्या माध्यमातून मनोरुग्ण आणि निराधार महिलांना सुरक्षितता व सन्मानाने जगण्याची संधी मिळणार आहे.
आमदार समाधान आवताडे म्हणाले, नातलगांनी त्याग केलेल्या पीडित, मनोरुग्ण आणि निराधार महिलांना मायेचे छत्र देण्याचे कौतुकास्पद कार्य ‘पालवी अपना घर’च्या माध्यमातून उभे राहिले आहे. पालवीचा हा सेवाभावी प्रकल्प मन हेलावून टाकणारा असून, समाजाला दिशा देणारा आहे. संस्थेला भेडसावणाऱ्या वैद्यकीय सुविधा, रस्ता आणि वीजपुरवठा यांसारख्या अडचणी सोडविण्यासाठी शासकीय पातळीवरून, आमदार निधीतून तसेच वैयक्तिक पातळीवरून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमास क्रेडाई पंढरपूरचे पदाधिकारी, नगरसेवक लक्ष्मण शिरसाट, ॲड. सुनील वाळूजकर, ॲड. इंद्रजित परिचारक, मनोज सुरवसे, संतोष डोंगरे, बापूसाहेब कदम, समाधान देठे, पालवी संस्थेचे आशिष शहा, अन्य विश्वस्त, समन्वयक तेजस घाडगे, पालवीतील सहकारी आणि हितचिंतक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Sonsने चंद्रशेखरन यांना निवडलं, पण टाटा ट्रस्ट्सचा विरोध! नोएल टाटाच खरे किंगमेकर? टाटामध्ये चेअरमनची निवड कशी होते?

Jos Buttler: जॉस बटलरचा वर्ल्ड रेकॉर्ड! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १५,००० धावा करणारा फलंदाज; विराट कोहली, रोहित शर्मा टॉप ५ मध्येही नाहीत

आम्ही कुठे जायचं? न्यायाधीशाचा प्रश्न; ५ महिन्यात २३ जणांना फाशीची शिक्षा, आता ९७ गंभीर खटले ट्रान्सफर होताच संतापले

गर्दीतून जात होती सलमान खानची कार, ड्रायव्हरच्या चूकीमुळे भाईजान चिडला, चालकाला जोरात मारलं अन्... Viral Video

Insulin Resistance Symptoms: डायबेटीस होण्याआधी शरीर देतं ‘हे’ संकेत; असं ओळखा तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे की नाही!

SCROLL FOR NEXT