रस्ते कामातील दिरंगाईविरुद्ध आज पाचगणी बंद
पाचगणी, ता. ७ : गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या सहनशीलतेचा आता अंत झाला आहे. प्रशासनाच्या या संथ आणि उदासीन कारभाराचा तीव्र निषेध करण्यासाठी उद्या (रविवारी) ‘पाचगणी बंद’ची हाक देण्यात आली आहे. पाचगणी क्लबमध्ये संयुक्त बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.
ऑक्टोबर २०२५ मध्ये पाचगणी ते भोसे या मुख्य मार्गावरील रस्ता खोदण्याचे काम सुरू झाले, मात्र, सहा महिने उलटूनही हे काम पूर्णत्वाकडे गेलेले नाही. वाई- सुरूर हा रस्ता आधीच अपूर्ण असताना पाचगणीतील या खोदकामामुळे ‘आगीत तेल’ ओतल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावर पसरलेली खडी आणि सतत उडणाऱ्या धुरळ्यामुळे शाळा- महाविद्यालयांचे विद्यार्थी, स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुचाकी घसरून होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले असून, पर्यटकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकारामुळे व्यवसायावरही गदा आली असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.
बैठकीस जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, नगराध्यक्ष दिलीप बगाडे, उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे, आघाडी अध्यक्ष शेखर कासुर्डे, नगरसेवक राजेंद्र पारठे, नरेंद्र बिरामने, प्रसाद कारंजकर, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मेहुल पुरोहित, स्वप्नील परदेशी, तसेच रोटरी पदाधिकारी, टॅक्सी असोसिएशनचे पदाधिकारी व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. संबंधित विभागाच्या मंत्र्यांना आणि शासकीय कार्यालयांना निवेदन देऊन रस्त्यांची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याची मागणी लावून धरण्याचे यावेळी ठरविण्यात आले.
शहरातील सर्व व्यवहार बंद राहणार असून, या बंदला पाचगणीतील व्यापारी, स्ट्रॉबेरी व्यावसायिक, टॅक्सी चालक- मालक संघटना आणि नागरिकांनी पाठिंबा दर्शविला आहे.
----------------------------
गुरेघरचाही पाठिंबा
उद्या (रविवारी) गुरेघर आणि परिसरातही बंद पाळून पाचगणी- महाबळेश्वर येथील ग्रामस्थ व व्यावसायिकांनी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी मॅप्रो गुरेघर बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सरपंच रमेश चोरमले यांनी दिली आहे.
-----------------------------------
07397
पाचगणी : येथे बैठकीत उपस्थितीत नागरिकांना मार्गदर्शन करताना शेखर कासुर्डे. त्या वेळी इतर.
-----------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.