पुणे

पाचगणी : पाचगणी-महाबळेश्वर रस्त्यावर भररस्त्यात हुल्लडबाजी; आठ तरुणांवर पोलिसांची कारवाई

CD


वाढत्‍या हुल्‍लडबाजीने
गिरिस्‍थानांवर अस्‍वस्‍थता

पाचगणीत आठ जणांविरुद्ध कारवाईचा बडगा

पाचगणी, ता. २१ : पाचगणी- महाबळेश्वर मुख्य रस्त्यावरील भोसे खिंड हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास भररस्त्यात चारचाकी वाहन उभे करून, मोठ्या आवाजात गाणी लावून, धिंगाणा घालणाऱ्यांना पाचगणी पोलिसांनी आपला खाक्‍या दाखवला. या अशा हुल्लडबाजीमुळे गिरीस्‍थानांवरील वातावरणात अस्‍वस्‍थता निर्माण होत असल्‍याचेही अधोरेखित झाले.
याप्रकरणी पाचगणी पोलिसांनी आठ तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सार्वजनिक शांततेचा भंग करून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
​काही हुल्लडबाजांनी आपली वाहने रस्त्याच्या मध्यभागी उभी केली होती. रात्रीच्या शांततेत मोठ्या आवाजात गाणी लावून हे तरुण आरडाओरडा करत धुंद नाचत होते. या प्रकारामुळे परिसरात सार्वजनिक शांततेचा भंग झाला होता. घटनेची माहिती मिळताच वरिष्‍ठांच्‍या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, पोलिस उपनिरीक्षक बालाजी सोनुने व पोलिस हवालदार श्रीकांत कांबळे यांनी तत्काळ तपास सुरू केला.
​पोलिसांनी घटनास्थळी धाव घेण्यापूर्वीच संबंधित तरुण तिथून पसार झाले होते. मात्र, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून पाहणी केली. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयितांची ओळख पटवली. यामध्ये राम जितेंद्र गोळे (वय २०), रोहित मिलिंद कांबळे (वय २०), शंकर देवानंद कोळी (वय २३), पवन आनंदा अनपट (वय २०), शुभम ऊर्फ साहिल सुभाष गायकवाड (वय २१), उद्धव रामदास कार्य (वय २१), आयुष महेश काळभोर (वय २०) आणि साहिल सुशील चव्हाण (वय २१) यांचा समावेश आहे. हे सर्व तरुण सातारा जिल्ह्यातील विविध भागांतील रहिवासी आहेत.
​तपासादरम्यान या तरुणांनी भोसे खिंड येथील मुख्य चौकात वाहन उभे करून केवळ गोंधळच घातला नाही, तर वाहतुकीस गंभीर अडथळाही निर्माण केल्‍याचे निष्‍पन्न झाले. याप्रकरणी पाचगणी पोलिसांनी सर्व संबंधितांवर महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ११० व ११७ अन्वये खटला दाखल केला आहे. पर्यटनाच्या नावाखाली अशा प्रकारे हुल्लडबाजी करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेचे नागरिकांमधून स्वागत होत आहे.

फोटो :............07332
पाचगणी : ताब्यात घेतलेल्‍या हुल्‍लडबाजांसमवेत पोलिस अधिकारी, कर्मचारी. (रविकांत बेलोशे : सकाळ छायाचित्रसेवा)
.................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT