पुणे

श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पंढरपूर येथे स्वच्छता अभियान संपन्न

CD

PDR26B09443
पंढरपूर : स्वच्छता अभियानाच्या प्रारंभप्रसंगी उपस्थित मान्यवर.

पंढरपुरातील स्वच्छता अभियान
एक हजार श्री सदस्यांचा सहभाग
.............
पंढरपूर, ता. ४ : पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार पंढरपूर शहरात विविध ठिकाणी सुमारे १ हजार २०० श्री सदस्यांमार्फत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून करण्यात आली.
याप्रसंगी पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, नगराध्यक्षा प्रणिता भालके, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, आरोग्य सभापती सुजित सर्वगोड, नगरसेवक अमोल डोके व पालिकेचे आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, आरोग्यविभाग कर्मचारी यांच्यासह प्रतिष्ठानचे श्री सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. दरवर्षी प्रतिष्ठानच्या वतीने इतरही सामाजिक उपक्रम राबवले जातात. यामध्ये रक्तदान शिबिर, निर्माल्य संकलन, (निर्मल्या पासून खत निर्मिती) वृक्षरोपण व वृक्ष संवर्धन, जल पुनर्भरण, आरोग्य शिबिर, अंधश्रद्धा निर्मूलन आदी सामाजिक उपक्रम राबवले जातात. या उपक्रमादरम्यान शहरातील विविध १५ ठिकाणी श्री सदस्यांनी ५ ट्रॅक्टर, १० घंटागाड्या, १० टेम्पो, ३ जेसीबी, ३ कॉम्पॅक्टरच्या सहायाने जवळपास २० टन ओला व सुका कचरा गोळा करून कासेगाव रोड येथील नगरपालिकेच्या कचरा डेपोमध्ये पाठवण्यात आला. या उपक्रमास पंढरपूर नगरपालिका प्रशासनाचे मोलाचे सहकारी लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान - नाना पटोले

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या डे-नाईट टेस्टसाठी भारतीय संघात मोठा बदल; कधी अन् कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT