पुणे

३९ तासांत ६०० किलोमीटरची सायकल राईड पूर्ण करणारे डॉ. श्रीधर यलमार यांचा सन्मान

CD

TVS26A00222
तावशी (ता. पंढरपूर) : पंढरपूरचे सायकलवीर.
---
६०० किमीची सायकल
राईड ३९ तासांत पूर्ण
सायकलर्स क्लबतर्फे सायकलवीरांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
तावशी, ता. २३ : जिद्द, चिकाटी आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर सायकलिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पंढरपूरच्या सायकलवीरांचा पंढरपूर सायकलर्स क्लबतर्फे गौरव करण्यात आला. कराड येथे झालेली ६०० किलोमीटरची ‘सह्याद्री बी.आर.एम.’ सायकल राईड अवघ्या ३९ तासांत पूर्ण करणारे अभिजित कुलकर्णी, प्रकाश शेटे आणि गणेश पाटील यांच्यासह पंढरपूर ते गोवा हा प्रवास सायकलवरून एकट्याने पूर्ण करणारे डॉ. श्रीधर यलमार यांचा सत्कार करण्यात आला.
क्लबचे अध्यक्ष अभिजित कुलकर्णी, खजिनदार प्रकाश शेटे आणि सदस्य गणेश पाटील यांनी सलग ३९ तास सायकल चालवत ६०० किलोमीटरचे अंतर यशस्वीरीत्या पार केले. डॉ. श्रीधर यलमार यांनीही पंढरपूर ते गोवा असा सायकल प्रवास एकट्याने पूर्ण करून आपली जिद्द दाखवून दिली.
कराड नाका येथील मनोरमा बँकेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात डॉ. हनुमंत दीक्षित आणि सुरेंद्र पिसे यांच्या हस्ते सायकलवीरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विवेक कुलकर्णी, विठ्ठल पाटील, महेश भोसले, अनिकेत गोंजारी यांच्यासह क्लबचे सदस्य उपस्थित होते.
सायकलिंगमधून आरोग्य, शारीरिक तंदुरुस्ती आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या सायकलवीरांच्या कामगिरीचे उपस्थितांनी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jio IPO: जिओ प्लॅटफॉर्म्स आयपीओचा जागतिक महाविक्रम; १ कोटींहून अधिक अर्जांचा टप्पा ओलांडणारा जगातील पहिलाच आयपीओ

Manoj Jarange Patil : कथित ५०० कोटींच्या व्यवहाराची एसआयटीमार्फत निष्पक्ष चौकशी करा; मराठा आंदोलनाबाबतच्या आरोपांवर मनोज जरांगे-पाटील यांची मागणी

WHO IS JINTIMANI KALITA?: कोण आहे जिंतिमणी कलिता? झिम्बाब्वेविरुद्ध भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण, हरमनप्रीत कौरने दिली खास कॅप

Marathi News Live Updates: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक; दुपारी २ वाजेपर्यंत ३८.८८ टक्के मतदान

Nilanga News : निलंगा तालुक्यात रेशनधारकांना दुष्काळात तेरावा महिना; गोदामातूनच ५० किलोच्या कट्ट्यात मिळतोय ४५ ते ४६ किलो धान्यसाठा

SCROLL FOR NEXT