पुणे

दुष्काळाचे सावट: तीन महिन्यांपासून पावसाने दिला खंड; रब्बीचीही आशा मावळली

CD

खरीप गेला; आता रब्बीची आशाही मावळली!
पंढरपूर तालुक्यात दुष्काळाचे सावट; तीन महिन्यांपासून पावसाने दिला खंड
भारत नागणे : सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. ३ : पंढरपूर तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने मोठा खंड दिल्याने तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर पोचला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर दमदार पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, मका, उडीद ही पिके हातची गेली आहेत. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने रब्बीतील गहू, हरभरा आणि ज्वारीच्या पेरणीची आशाही मावळली आहे.
या परिस्थितीचा थेट परिणाम कृषी बाजारपेठेवर झाला असून बी-बियाणे आणि खत विक्रीची दुकाने ओस पडली आहेत. पंढरपूर, भोसे, करकंब, भाळवणी, कासेगाव, गोपाळपूर परिसरातील अनेक कृषी सेवा केंद्रांमध्ये ‘माल नाही’ऐवजी ‘गिऱ्हाईकच नाही’ अशी स्थिती आहे. गेल्या महिन्यापासून दुकाने दिवसभर सुरू असूनही खते-बियाण्यांची विक्री होत नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. रब्बी हंगामासाठी आणलेला बियाण्यांचा साठाही पडून आहे.
पंढरपूर येथील कृषी सेवा केंद्राचे चालक भैया थोरात म्हणाले, गतवर्षी याच काळात दररोज २०० ते ३०० पोती खताची विक्री होत होती. यंदा पाऊस नसल्याने पेरणीच झाली नाही. त्यामुळे खत कोण घेणार? बँकेचे हप्ते आणि दुकानाचे भाडे कसे भरायचे, हा प्रश्न आहे. बँकांनी कर्जाच्या व्याजदरात सवलत द्यावी.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार ऑक्टोबरमध्येही मोठ्या पावसाची शक्यता नसल्याने शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना पीकविमा आणि चारा छावण्यांची सुविधा द्यावी, तसेच खते-बियाणे विक्रेत्यांना व्याजमाफी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.
---
चौकट
पावसात ४८४ मिमीची तूट
तालुका कृषी कार्यालयाच्या प्राथमिक माहितीनुसार, पंढरपूर तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान सुमारे ५९४ मिमी आहे. त्यापैकी ८० टक्के पाऊस जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत पडतो. गतवर्षी सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे ५० हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते, तसेच भीमा नदीला पाच वेळा पूर आला होता. यंदा सप्टेंबरमध्ये केवळ २४ मिमी पाऊस झाला. गतवर्षी १ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान तालुक्यात सरासरीपेक्षा १२० टक्के अधिक पाऊस झाला होता. यंदा याच कालावधीत सरासरीच्या केवळ ३८ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ४८४ मिमी पावसाची तूट आहे.
---
कोट
गेल्या वर्षी पंढरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. तुलनेत यंदा आतापर्यंत केवळ ३८ टक्के पाऊस झाला आहे. पावसाअभावी खरीप पिके पूर्णपणे वाया गेली असून, रब्बीच्या पेरण्याही अद्याप झालेल्या नाहीत. येत्या काळात पाऊस झाला तरच पेरणी शक्य होईल. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ४८४ मिलिमीटर पाऊस कमी झाला असल्याने दुष्काळाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
- सूर्यकांत मोरे, तालुका कृषी अधिकारी, पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले, ‘आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी’

MVA Legislative Council : विधानपरिषदेवरून महाविकास आघाडीत एकमत नाही, काँग्रेस, ठाकरे गटात ठिणगी पडली

Ambajogai Robbery Case : अंबाजोगाईतील 'हायप्रोफाईल' घरफोडीचा एलसीबीकडून छडा; फरार म्होरक्याला बेड्या, कोट्यवधींचा ऐवज जप्त

Otur News : खासगी क्लासेसवर अंकुश कोणाचा? कठोर पावले उचलण्याची गरज

Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स

SCROLL FOR NEXT