UPR26B08694
पंढरपूर : श्री विठ्ठल मंदिर समिती गोशाळेच्या समर्थनार्थ करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झालेले महाविकास आघाडीचे पदाधिकारी.
मंदिर समितीच्या गोशाळेला ‘मविआ’चा पाठिंबा
ठराव रद्द केल्यास आंदोलनाचा इशारा; पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. १५ : पंढरपूरमधील बहुचर्चित श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळेच्या जागेवरून राजकारण तापले आहे. गोशाळेला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. गोशाळेचा ठराव रद्द केल्यास शहरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
गोशाळेला भारतीय जनता पक्षाने विरोध केला असून, नगरपरिषदेतील गोशाळेच्या जागेचा ठराव रद्द करण्याची मागणी भाजपने केली आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष आदित्य फत्तेपुरकर यांनी भाजपवर टीका केली. ‘‘भाजपचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. गायीला गोमाता म्हणून हिंदूंच्या मतांसाठी फक्त गायीचे भांडवल करणे एवढेच या पक्षाला माहीत आहे. प्रत्यक्ष जेव्हा गोशाळेचा विषय आला तेव्हा भाजपच्या लोकांनीच गोशाळेला विरोध केला, ही वस्तुस्थिती संपूर्ण पंढरपूरला माहीत आहे,’’ असा घणाघात त्यांनी केला.
यावेळी पंढरपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदित्य फत्तेपुरकर, तालुकाध्यक्ष संदीप पाटील, राष्ट्रवादीचे नेते सागर पडगळ, शिवसेनेचे न रणजीत बागल, माजी अध्यक्ष नागेश गंगेकर, सुहास बाळवणकर, महेश अधटराव, स्वराज फुगारे, रामेश्वर पाटील, बाळासाहेब आसबे, अनिल माने, धीरज डांगे, शकील रत्नपारखी, नागनाथ अधटराव आदींसह महाविकास आघाडीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट...
२८ विषय स्थगित ठेवल्याने संताप
गोशाळेचा ठराव नगराध्यक्ष प्रणिता भालके यांनी न घेतल्यामुळे नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेतील २८ विषय स्थगित ठेवण्यात आले होते. याबाबत मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. त्यात महिला बालकल्याण समितीचे संवेदनशील विषय तसेच अंध-अपंगांना द्यावयाच्या अनुदानाचे विषय होते. हे विषयही भारतीय जनता पक्षाने स्थगित ठेवल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.