पुणे

गृहनिर्माण संस्थेचा भुखंड झाला गहाणमुक्त

CD

पंढरीतील शासकीय कर्मचाऱ्यांच्या
‘गृहनिर्माण’चा भूखंड गहाणमुक्त
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ८ : पंढरपुरातील महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्थेतील ८५ पात्र सभासदांना शासनाने १९८८ मध्ये ३८ लाख ३८ हजार ०५१ रुपयांचे कर्ज दिले होते. या कर्जाची पूर्ण परतफेड झाल्याने शासनाने संबंधित भूखंड गहाणमुक्त केला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय सहकार विभागाने आज (शुक्रवारी) घेतला.
महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सर्व ८५ सभासदांनी वितरित करण्यात आलेल्या कर्जाची रक्कम व त्यावरील व्याज शासनास परतफेड केले आहे. सभासद व संस्थेने ना-देय प्रमाणपत्रेही प्राप्त केली आहेत. संस्थेच्या सभासदांच्या ना-देय प्रमाणपत्रांवरून तसेच खतावणीमधील नोंदींवरून संस्थेमार्फत दिलेले कर्ज व्याजासह वसूल झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
संस्थेकडे शासनाचे कोणतेही येणे बाकी नसल्याने भूखंड गहाणखतातून मुक्त करण्यासाठी संस्थेने शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार पंढरपूर येथील सर्व्हे नं. ९९/३-अ मधील ४० हजार चौरस मीटर भूखंड व त्यावरील बांधकाम गहाणखतातून मुक्त करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिवसेना पक्ष-चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी निर्णायक वळणावर, कपिल सिब्बल यांनी चंद्रचूड यांच्या निरीक्षणाचा दिला दाखला; काय घडलं?

प्रकरण मिटवण्यासाठी १ कोटी! ट्रेनी IPSची पहिल्याच पोस्टिंगमध्ये लाचखोरी; कोर्टाने DGPकडे मागितला अहवाल

Syria Court Verdict : सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना फाशीची शिक्षा; भावालाही मृत्युदंड, न्यायालयाचा मोठा निर्णय

“स्प्लेंडर फिरवतोय माझा जानू!” ऐश्वर्या-अविनाश नारकरांच्या डान्सने वेधलं लक्ष, Viral Video

Marathi News Live Updates : १९९९ च्या पक्षघटनेत मुख्य नेता पद नव्हतं मग ते शिंदेंना कुणी दिलं? कपिल सिब्बल यांच्या सर्वात मोठा युक्तिवाद

SCROLL FOR NEXT