PDR26B09348
पंढरपूर : क्रेडाई गृहोत्सव २०२६ प्रदर्शन पाहण्यासाठी झालेली गर्दी.
..........
क्रेडाई गृहोत्सव प्रदर्शनाला
पंढरपुरात उत्स्फूर्त प्रतिसाद
..........
गृहखरेदीदार, गुंतवणूकदार अन् नागरिकांनी दिली भेट
..........
पंढरपूर, ता. १७ : क्रेडाई पंढरपूर आयोजित ‘क्रेडाई गृहोत्सव २०२६’ या प्रदर्शनाला गृहखरेदीदार, गुंतवणूकदार आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. येथील रेल्वे ग्राउंडवर सुरू असलेल्या गृह प्रदर्शनाला मोठी गर्दी होत आहे. घर खरेदीसाठी इच्छुक नागरिकांनी प्रदर्शनातील स्टॉल्सना प्रत्यक्ष भेट देत विविध गृहप्रकल्पांची माहिती घेतली, तर अनेकांनी प्राथमिक व्यवहारही निश्चित केल्याचे चित्र दिसून आले. रविवारी (ता. १८) प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन क्रेडाई पंढरपूरचे अध्यक्ष आशिष शहा आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
या प्रदर्शनात नामांकित बिल्डर्स व डेव्हलपर्स यांचे तब्बल १२० स्टॉल्स असून ग्राहकांना पंढरपूर शहर व परिसरातील निवासी, व्यावसायिक, टाऊनशिप तसेच अनेक गृह प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध झाली आहे. ग्राहकांना फ्लॅट्स, बंगला, रो हाऊसेस प्रकल्पांची माहिती सहज समजावी यासाठी प्रत्येक स्टॉल मध्येगृह प्रकल्पांची मॉडेल्स, डिजिटल सादरीकरण आणि ग्राहकांच्या शंका दूर करण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कोट
PDR26B09347
पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेले गृह उत्सव २०२६ हे प्रदर्शन सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय उपयुक्त ठरले. घरबांधणी, इंटिरियर, फर्निचर, विद्युत व प्लंबिंग साहित्य तसेच आधुनिक गृहसंकल्पनांची माहिती एकाच ठिकाणी मिळाली. विविध स्टॉल्सवरील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केल्यामुळे आम्हाला घर खरेदी करण्याकरिता योग्य निर्णय घेणे सोपे झाले आहे.
- निलोफर पठाण, पंढरपूर
कोट
PDR26B09346
प्लॉट खरेदी करून नवीन घर बांधणे सध्या सर्वसामान्यांच्या बजेट बाहेर जात आहे. त्यामुळे सदनिका खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. या प्रदर्शनामध्ये आम्हाला विविध गृहप्रकल्पांची माहिती मिळाली जेणेकरून आपल्या बजेटमधील फ्लॅट खरेदी करण्यासाठी उपयुक्त आहे.
- प्रमोद कुलकर्णी, पंढरपूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.