पुणे

पंढरपूर-मंगळवेढा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी

CD

KSG26A00082, KSG26A00084
अनवली (ता. पंढरपूर) : येथील पंढरपूर-मंगळवेढा महामार्गावरील कासार मळा या ठिकाणी रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या भेगा. (दुसऱ्या छायाचित्रात) खचलेला रस्ता चुकवताना घडलेल्या अपघातात साइड गटारीमध्ये पडलेली दुचाकी.
---
भेगाळलेल्या रस्त्यावर जीवघेणा प्रवास!
पंढरपूर-मंगळवेढा रस्त्याची दुरवस्था; जड वाहनांच्या वर्दळीमुळे धोका
हनुमंत शिंदे : सकाळ वृत्तसेवा
कासेगाव, ता. २४ : पंढरपूर- मंगळवेढा मुख्य मार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या भेगा आणि खचलेल्या रस्त्यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्याची दुरवस्था, रात्रीच्या वेळी भेगा न दिसणे आणि वाढलेली जड वाहतूक यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपेही वाढली असून, या मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
कासेगाव बायपास रस्ता नादुरुस्त असल्याने सध्या पंढरपूर- मंगळवेढा मार्गावरून मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होत आहे. दररोज हजारो वाहने या मार्गावरून ये-जा करतात. अशा परिस्थितीत रस्त्याच्या मधोमध पडलेल्या मोठ्या भेगा आणि खचलेल्या भागांमुळे वाहनचालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना या भेगांमुळे अपघाताचा धोका असून, रात्रीच्या वेळी रस्त्याची स्थिती लक्षात येत नसल्याने प्रवास अधिक धोकादायक बनला आहे.
या मार्गावर ठिकठिकाणी काटेरी झुडपे वाढल्यानेही वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे जड वाहतुकीचा वाढलेला ताण आणि दुसरीकडे रस्त्याची दुरवस्था यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. रस्त्याची दुरुस्ती करावी, तसेच आवश्यक ठिकाणी गतिरोधक बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
---
कोट
रस्त्याची पाहणी करून ज्या ठिकाणी खराब झालेला आहे, त्या ठिकाणी तत्काळ दुरुस्त करण्याचे काम हातात घेऊ. तसेच ठिकठिकाणी गतिरोधक बसविण्याबाबत संबंधित ग्रामपंचायतीने केलेल्या मागणीनुसार रस्ते सुरक्षा समितीची मंजुरी घेऊन गतिरोधक करण्यात येतील.
- के. एस. शेख, उपविभागीय अभियंता, राष्ट्रीय महामार्ग
--
कोट
KSG26A00083
पंढरपूर-मंगळवेढा हा रस्ता कर्नाटक राज्याला जोडणारा मुख्य राज्य मार्ग असून, या रस्त्यावरून अहिल्यानगर ते बंगळूर अशी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. एकलासपूर , सिद्धेवाडी हायस्कूल या ठिकाणी रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची वेळोवेळी लेखी मागणी केली आहे; मात्र प्रशासन दुर्लक्ष करत आहे. तत्काळ गतिरोधक करून रस्ता दुरुस्त करावा.
- योगेश ताड, संचालक, सहकार शिरोमणी कारखाना
----
कोट
PNE26W61417
पंढरपूर-मंगळवेढा या रस्त्याबाबत प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष असल्यामुळे सध्या अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. आणखी किती जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार आहे?
- लखन सूर्यवंशी, नागरिक, अनवली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Career Growth: ज्याला तीन लाख वार्षिक पगाराच्या कामावरून कंपनीने काढलं, त्याच तरुणाला आली दुबईतील १.५ कोटींच्या नोकरीची ऑफर

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

पुढच्या सात दिवसांत ४ राशींचं नशीब चमकणार! धनलाभासह करिअरमध्ये प्रगतीचे योग

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

CBI Arrests ED officers : दुसऱ्यांवर धाडी टाकणाऱ्या ED अधिकाऱ्यांवरच CBI ची झडप! केसमधून वाचवण्यासाठी केला होता 'हा' मोठा सौदा

SCROLL FOR NEXT