पुणे

निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे हातातोंडाशी आलेले पीक धोक्यात पाण्याअभावी डाळिंब बागा होरपळल्या; शेतकऱ्यांसमोर बागा जगविण्याचे संकट!

CD

TVS26A00208
तावशी (ता. पंढरपूर) ः येथील कुबेर आसबे यांची जळू लागलेली डाळिंब बाग. (फोटो : पांडुरंग सूर्यवंशी)

हातातोंडाशी आलेल्या डाळिंबाच्या बागा होरपळल्या
पाण्याअभावी झाडांची पानगळ; उत्पन्नाची आशा मावळल्याने शेतकरी हवालदिल

सकाळ वृत्तसेवा
तावशी, ता. १३ : पावसाने दडी मारल्याने पंढरपूर तालुक्यातील तावशी परिसरात डाळिंबाच्या फळबागा पाण्याअभावी सुकू लागल्या आहेत. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने झाडांची पाने गळत असून, काही झाडे वाळण्याच्या मार्गावर आहेत. बागा उभ्या करण्यासाठी केलेला मोठा खर्च आणि त्यातच निर्माण झालेली पाणीटंचाई यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. हातातोंडाशी आलेल्या बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असून, नुकसानग्रस्त बागांचे पंचनामे करून तातडीने मदत द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पंढरपूर तालुक्यातील अनेक शेतकरी डाळिंबासारख्या फळपिकांवर अवलंबून आहेत. फळबाग उभी करण्यासाठी रोपे, खते, औषधे, मजुरी आणि पाण्याच्या व्यवस्थेवर मोठा खर्च करावा लागतो. पाण्याची बचत करण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला जात असला, तरी पाण्याचे स्रोतच आटू लागल्याने बागांना आवश्यक पाणी देणे कठीण झाले आहे. यंदा पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने शेतकऱ्यांची बागा जगविण्यासाठी धडपड सुरू आहे.

डाळिंबाच्या झाडांना वेळेवर पाणी न मिळाल्यास त्यांची वाढ, फळधारणा आणि उत्पादनावर परिणाम होतो. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करतानाच पर्यायी स्रोतांमधून पाण्याची व्यवस्था करण्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.

पंचनामे सुरू; मदतीची प्रतीक्षा
पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीत शेतीपिकांच्या नुकसानीचा प्रश्न गंभीर बनला आहे. तावशी आणि परिसरातील पिकांचे पंचनामे सुरू असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष या प्रक्रियेकडे लागले आहे. प्रत्यक्ष नुकसानीची नोंद घेऊन पात्र शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा आहे.

कोट
मोठ्या कष्टाने आणि खर्च करून डाळिंबाची बाग उभी केली आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाणी देण्याची इच्छा असूनही पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. बाग कशी टिकवायची, हा प्रश्न पडला आहे. पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी.
- कुबेर आसबे, नुकसानग्रस्त डाळिंब उत्पादक शेतकरी, तावशी

कोट
- तावशी व परिसरातील पिकांचे सध्या पंचनामे सुरू आहेत. कोणताही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. पंचनाम्यांचे काम जलद गतीने सुरू आहे.
- आनंद सोनवणे, ग्राममहसूल अधिकारी, तावशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gandhinagar: अमित शाहांच्या मतदारसंघात काय घडलं? गांधीनगर महानगरपालिका निवडणुकीत भाजपने किती जागा जिंकल्या?

UPI MDR Charges: PhonePe, Google Pay वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; MDR शुल्कांबाबत मोठा निर्णय

Ranji Trophy 2026-27 : गड आला, पण...! मुंबईने डावाने विजयासह बोनस गुण कमावला, मात्र आयुष म्हात्रे ६ आठवड्यांसाठी मैदानाबाहेर गेला; नेमकं काय घडलं?

संतूर मॉम! रश्मी अनपट आहे आठ वर्षाच्या मुलाची आई; शेअर केले खास फोटो; नेटकरी म्हणाले- याची बायको आली की तू...

Latest Marathi News Live Update: यूपीआयवरील चार्जेस दिवाळीनंतर लागू होणार

SCROLL FOR NEXT