पुणे

अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पंढरपूरला परतीच्या पावसाने झोडपले; रब्बी पेरणीच्या आशा पल्लवित

CD

पंढरपूरला परतीच्या पावसाने झोडपले
अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर हजेरी; रब्बी पेरणीच्या आशा पल्लवित

पंढरपूर, ता. २२ : अनेक दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर पंढरपूर शहर व तालुक्यात मंगळवारी (ता. २२) परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. दुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असून, रब्बी हंगामाच्या पेरणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
यंदा सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पंढरपूर तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. खरीप हंगाम जवळपास वाया गेल्याने शेतकऱ्यांचे लक्ष परतीच्या पावसाकडे लागले होते. सोमवारी सायंकाळी तालुक्यातील काही भागांत हलक्या सरी कोसळल्या. त्यानंतर मंगळवारी दुपारनंतर ढग दाटून येत जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहरासह ग्रामीण भागात सुमारे एक ते दीड तास पाऊस झाला. उपरी, वाखरी, भंडीशेगाव, गादेगाव, टाकळी, गोपाळपूर यासह तालुक्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. ओढे-नाले वाहू लागले असून, शेतांमध्ये पाणी साचले आहे.
या पावसामुळे रब्बी हंगामातील ज्वारी, बाजरी, मका तसेच हरभरा पेरणीसाठी जमिनीत ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे पेरणीयोग्य वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून जाणवणारा उकाडाही कमी झाला असून, हवेत गारवा निर्माण झाला आहे. मात्र, रब्बी हंगामासाठी हा पाऊस पुरेसा नसल्याने शेतकरी आणखी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आणखी एक-दोन जोरदार पाऊस झाल्यास रब्बी हंगामाला चांगली सुरुवात होईल, अशी आशा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

विजांच्या कडकडाटात पाऊस
नातेपुते : नातेपुते शहर व परिसरात दिवसभर कडाक्याचा उकाडा जाणवत होता. सायंकाळी पाचच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कालपासून सुरू झालेल्या पावसामुळे दुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. व्यापारी वर्गातही समाधानाचे वातावरण आहे. सायंकाळी पाचपासून विजांचा कडकडाट सुरू असून, मुसळधार पाऊस सुरूच आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गालाही दिलासा मिळाला आहे.

चौकट
दिवाळीच्या बाजारपेठेलाही दिलासा
दुष्काळामुळे यंदाची दिवाळी कशी होणार, शेतात पिके नाहीत तर बाजारात ग्राहक कसे येणार, अशी चिंता व्यापारी वर्गाला होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे ही चिंता काही प्रमाणात दूर झाली असून, दिवाळीच्या बाजारपेठेलाही चांगली चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

सुवर्णपदकासोबत भारतीय खेळाडूंना मिळाल्या ‘त्या’ बाहुल्यां नेमक्या कशासाठी दिली जाते ही खास भेट? जपानच्या रंजक परंपरेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT