UPR26B08712
पंढरपूर : केसकरवाडी येथील वसतिगृह कार्यालयाला टाळे ठोकल्या नंतर कर्मचाऱ्यांना जाब विचारताना युवासेनेचे रणजित बागल व इतर पदाधिकारी
चार दिवस उलटूनही ना मदत, ना गुन्हा;
ठाकरे युवा सेनेकडून कार्यालयाला टाळे
केसकरवाडी येथील वसतिगृह चालक व शिक्षकांवर गुन्हा दाखलची मागणी
पंढरपूर, ता. १७ : केसकरवाडी (ता. पंढरपूर) येथील शिवराम केसकर मागासवर्गीय वसतिगृहातील दहावीत शिकणारा विद्यार्थी समर्थ बोबडे याचा उजनी उजव्या कालव्यात बुडून मृत्यू होऊन चार दिवस उलटले, तरी वसतिगृह, शाळा आणि पोलिस प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. पीडित कुटुंबाला अद्याप आर्थिक मदतही मिळालेली नाही. याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा सेनेचे रणजित बागल व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी (ता. १७) केसकरवाडी येथील संस्थेच्या कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन केले.
या घटनेला वसतिगृह चालक व संबंधित शिक्षक जबाबदार असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली होती. मात्र, पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. ज्या संस्थेच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, त्या संस्थेने कुटुंबाचे सांत्वन करणे किंवा आर्थिक मदत करणेही टाळल्याचा आरोप युवा सेनेने केला.
‘संस्थेची मान्यता रद्द करा’
यावेळी रणजित बागल म्हणाले, "तीन दिवस झाले, आज चौथा दिवस आहे; मात्र शाळेच्या किंवा वसतिगृहाच्या प्रशासनाने साधे लक्षही दिले नाही. निष्पाप विद्यार्थ्याचा जीव गेला तरी तुम्हाला किंमत वाटत नसेल, तर आम्ही आता फक्त टाळे ठोकले आहे. यापुढे या संस्थेची मान्यता रद्द करून तुम्हाला खडी फोडायला पाठवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.