पुणे

पंढरपूर नगरपालिकेच्या उद्याच्या सभेत पार्किंग व आरोग्य कर ठेक्याचा विषय गाजणार; भाविकांसह स्थानिकांचा तीव्र विरोध

CD

कराचा प्रस्ताव मंजूर
होणार की स्थगित?
पंढरपूर न.पा.च्या आजच्या सभेकडे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. ८ : पंढरपूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी (ता. ९) होत आहे. बाहेरगावाहून श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या वाहनांकडून पार्किंग व आरोग्य कर वसुलीचा ठेका देण्याचा प्रस्ताव सभेत मांडण्यात येणार आहे. प्रस्तावावर चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता असली तरी, स्थानिक नागरिक, भाविक आणि काही नगरसेवकांकडून या प्रस्तावाला विरोध होत असल्याने सभेकडे लक्ष लागले आहे.
पंढरपूरला दररोज राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येतात. त्यांच्या वाहनांकडून पार्किंग व आरोग्य कराच्या नावाखाली वसुली केल्यास भाविकांमध्ये नाराजी निर्माण होऊन पंढरपूरच्या प्रतिमेवर परिणाम होईल, अशी भूमिका विरोधकांकडून मांडली जात आहे. या करामुळे भाविकांची संख्या कमी होऊन स्थानिक व्यवसायावरही परिणाम होण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.
यापूर्वीही पालिकेने पार्किंग व आरोग्य कराची वसुली सुरू केली होती. त्यावेळी सोशल मीडियावर भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. भाविकांकडून ‘जिझिया करासारखी वसुली’ होत असल्याची टीका झाल्यानंतर वाद निर्माण झाला आणि अखेर ठेका रद्द करण्यात आला होता. आता पुन्हा याच विषयाचा प्रस्ताव आल्याने विरोधाची धार वाढली आहे. सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांचाही प्रस्तावाला अंतर्गत विरोध असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे प्रस्ताव मंजूर होतो की पुन्हा स्थगित होतो, याकडे पंढरपूरकरांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतात पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार? कच्चा तेलाच्या किंमती १०० डॉलरच्या पार...

Pune News : दहीहंडीत नियमांचे उल्लंघन; आणखी नऊ गुन्हे दाखल; मंडळाच्या १६ पदाधिकाऱ्यांचा समावेश

Tata Punch: 'टाटा पंच' गाडीचा नवा विक्रम! 'या' कारला टाकलं मागे, देशात पहिल्या क्रमांकाची पसंती; काय आहे खास?

Marathwada Irrigation Demand: खरीप पिकांना जीवदानासाठी सिद्धेश्वर, येलदरी धरणातून तातडीने पाणी सोडा; आमदार राजू नवघरे यांची जलसंपदा मंत्र्याकडे मागणी

Dancer Aishwarya Jadhav : अश्लील नृत्याला परवानगी देऊ नका; मात्र कलेचा आदर करणाऱ्यांना परवानगी द्या

SCROLL FOR NEXT