Pandit Bhimsen Joshi Kalamandi sakal
पुणे

Pandit Bhimsen Joshi Kalamandi : नाट्यगृह सुसज्ज... पण नाट्यप्रयोगांची प्रतीक्षा! ; पं. भीमसेन जोशी कलामंदिराची देखभाल-दुरुस्तीची कामे पूर्ण

औंध येथील पं. भीमसेन जोशी कलामंदिरात नुकतीच देखभाल-दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. हे नाट्यगृह सुसज्ज झाले असून, रंगमंचाच्या सदोष रचनेमुळे अद्यापही या नाट्यगृहाला नाट्यप्रयोगांची प्रतिक्षाच आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : औंध येथील पं. भीमसेन जोशी कलामंदिरात नुकतीच देखभाल-दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. हे नाट्यगृह सुसज्ज झाले असून, रंगमंचाच्या सदोष रचनेमुळे अद्यापही या नाट्यगृहाला नाट्यप्रयोगांची प्रतिक्षाच आहे.

औंध, बाणेर, पाषाण, सूस आदी परिसरातील नाट्यप्रेमींच्या सोयीसाठी बांधण्यात आलेल्या या नाट्यगृहाचे उद्‍घाटन २०१३ मध्ये झाले होते. जवळपास पाचशे प्रेक्षकक्षमता असलेले नाट्यगृह आणि कलादालन, असे याचे स्वरूप आहे. शहरात नाट्यगृहाच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली असताना, पहिल्या टप्प्यात बालगंधर्व रंगमंदिरासह येथेही देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात आली.

या कामांमध्ये नाट्यगृहातील खुर्च्यांची दुरुस्ती करण्यात आली. नाट्यगृहाच्या आतील आणि बाहेरील बाजूस रंगरंगोटीची कामे करण्यात आली. तसेच पडद्याची दुरुस्ती, विंगांची दुरुस्ती आदी कामेही येथे पूर्ण झाली. यानंतर हे नाट्यगृह पुन्हा एकदा सुसज्ज झाले असले, तरी येथील रंगमंचाचा आकार कमी असल्याने नाट्यप्रयोगांची अद्यापही वानवा आहे.

औंध परिसरातील नागरिकांना नाटके पाहण्यासाठी चांगले नाट्यगृह उपलब्ध व्हावे, या उद्देशाने याचे बांधकाम करण्यात आले, तरी यातील रचनेत अनेक दोष आहेत. येथील रंगमंचाचा आकार कमी असून, विंगांशेजारी असणारी जागाही कमी आहे. परिणामी व्यावसायिक नाटकांना त्यांच्या नेपथ्यासाठीची पुरेशी जागा येथे उपलब्ध होत नाही. त्यामुळेच २०१३ मध्ये उद्‍घाटन झाल्यानंतर या नाट्यगृहात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियमितपणे आयोजन केले जाते. मात्र, अद्यापही नाटकांचे प्रयोग येथे नियमितपणे होत नाहीत.

अन्य पर्यायांचा विचार...

पं. भीमसेन जोशी कलामंदिरातील रंगमंचाची रचना सदोष असल्याने येथे मोठ्या नेपथ्याची गरज असणाऱ्या व्यावसायिक नाटकांचे प्रयोग होऊ शकत नाहीत. मात्र, प्रायोगिक नाटके, एकांकिका याचे सादरीकरण येथे केले जाऊ शकते. तसेच राज्य सरकारतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेतील प्रयोगही येथे होऊ शकतात. आसपासच्या परिसरातील प्रेक्षकही या कार्यक्रमांना प्रतिसाद देतील. त्यामुळे हे नाट्यगृह योग्य पद्धतीने कार्यरत ठेवण्यासाठी महापालिकेला अशा पद्धतीच्या अन्य पर्यायाचा विचार करावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मॉकड्रिलवेळी हातात फुटलं ग्रेनेड, ४ पोलीस गंभीर जखमी; अहिल्यानगरमध्ये दुर्घटना

जास्त भावुक नका होऊ! कॉकरोच जनता पार्टीविरोधात याचिका, सरन्यायाधीश काय म्हणाले?

Share Market: पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे शेअर बाजारातील या 3 शेअरमध्ये मोठी तेजी!

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात पेट्रोल चोरांचा धुमाकूळ; राजारामपुरीतील रहिवासी त्रस्त

Electricity Bill Reducing Tips : उन्हाळ्यात लाईट बिल प्रचंड वाढवतात 'ही' 3 छोटी उपकरणे, आजच वापर करा कमी

SCROLL FOR NEXT