PGN26B01345
पानगाव (ता. बार्शी) : येथील संत तुकाराम विद्यालयात एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या सन्मानाप्रसंगी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व मान्यवर.
---
पानगावात शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वितांचा सन्मान
पानगाव, ता. ३ : येथील संत तुकाराम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय येथे एनएमएमएस या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला.
एनएमएमएस या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये विद्यालयाच्या २८ विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. त्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी जगताप यांनी केले. यावेळी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार तथा शालेय समितीचे चेअरमन जयकुमार शितोळे यांनी शाळेच्या गुणवत्तापूर्ण वाटचालीबद्दल समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर पानगावचे नूतन जिल्हा परिषद सदस्य नंदकुमार काळे, मुख्याध्यापक आनंद कसबे, संतोष कानगुडे, विद्याधर गव्हाणे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, पानगावचे सरपंच जयसिंगराव देशमुख, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी अभिनंदन केले. अमोल महाले यांनी सूत्रसंचालन केले. धनश्री जाधव यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.