पुणे

खरेदी थांबल्याने पंढरपुरात 16 हजार क्विंटल मका शेतकर्यांच्या दारात पडून; हमीभाव खरेदी सुरु करण्याची मागणी

CD

पंढरपुरात १६ हजार क्विंटल मका शेतकऱ्यांकडे पडून
हमीभाव केंद्रावर खरेदी थांबली; केवळ साडेतीन हजार क्विंटल मालाची खरेदी

सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. १९ ः अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने पंढरपूर येथील हमीभाव केंद्रावरील मक्याची खरेदी थांबवली आहे. खरेदी बंद झाल्याने सुमारे १६ हजार क्विंटल मका शेतकऱ्यांच्या दारात पडून आहे. दरम्यान, हमीभाव खरेदी केंद्र बंद झाल्याने तालुक्यातील खासगी व्यापाऱ्यांनी मनमानी पद्धतीने हमीभावापेक्षा कमी दरात मक्याची खरेदी सुरू केली आहे. शासनाने पंढरपूर येथील मका खरेदी केंद्र सुरू करावे, अन्यथा सरकार विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा रयत क्रांती शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी दिला आहे.
पंढरपूर तालुक्यात मक्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले होते. मक्याला सरकारने २४०० रुपये क्विंटल हमी भाव जाहीर केला आहे. त्यानुसार अन्न व नागरी पुरवठा विभागाने येथील खरेदी विक्री संघामार्फत मक्याची जानेवारीमध्ये हमीभावाने खरेदी सुरू केली झाली. यामध्ये तालुक्यातील ४९६ शेतकऱ्यांनी १९ हजार क्विंटल मक्याची नोंदणी केली होती. फक्त दहा दिवसच मक्याची खेरदी करण्यात आली. त्यानंतर मका खरेदी केंद्र बंद झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, दहा दिवसामध्ये फक्त साडेतीन हजार क्विंटल मक्याची खरेदी करण्यात आली. उर्वरित सुमारे १६ हजार क्विंटल मका अजूनही शेतकऱ्यांच्या दारात खरेदी अभावी पडून आहे. शासकीय खरेदी केंद्र बंद होताच बाजारात मक्याचे भाव पडले आहेत. सध्या बाजारात १६०० रुपये क्विंटल दराने मक्याची खरेदी केली जात आहे. खरेदी केंद्र बंद झाल्याने व्यापारी मालामाल झाले तर मका उत्पादक शेतकरी मात्र आर्थिक अडचणीत आले आहेत.
-----
चौकट...
खरेदी केलेल्या मक्याचे ८४ लाख रुपये थकीत
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात खरेदी केलेल्या ९० शेतकऱ्यांच्या मक्याचे पैसे अद्याप मिळाले नाही. जवळपास ८४ लाख रुपये शासनाकडे थकले आहेत. एक महिना उलटून गेल्यानंतरही पैसे मिळाले नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. खरेदी केलेल्या मक्याची थकीत रक्कम तातडीने द्यावी, अशी मागणीही रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
--------
कोट
पंढरपूर येथील मका खरेदी केंद्रामध्ये दहा दिवसांमध्ये साडेतीन हजार क्विंटल मक्याची हमीभावाने खरेदी करण्यात आली. त्यानंतर खरेदी बंद करण्याच्या सूचना आल्या आहेत. येथील खरेदी केंद्रामध्ये ४९६ शेतकऱ्यांनी १९ हजार क्विंटल मक्याची नोंदणी केली आहे. शासनाचे आदेश आल्यानंतर मका खरेदी सुरू केली जाईल.
- शांतीनाथ बागल, अध्यक्ष, खरेदी विक्री संघ, पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trimbakeshwar Temple Scam : 3 हजारात 10 मिनिटात त्र्यंबकेश्वराचं दर्शन, विश्वस्त काकासह 2 पुतणे गजाआड; पेड दर्शनाला मंदिर व्यवस्थापनाचा वरदहस्त

आमदनी अठन्नी खर्चा रुपैय्या! एसटीला दररोज दीड कोटींचा तोटा; प्रशासनाचं नियंत्रण नाही, मंत्री सरनाईकांची नाराजी

Supreme Court: लाखोंच्या आस्थेला चुकीचे ठरविणे कठीण; सरन्यायाधीशांची टिप्पणी, शबरीमला प्रकरण सुनावणीवेळी धर्माला खिळखिळे न करण्याचे आवाहन!

Women Reservation: महिला आरक्षणापुरताच पाठिंबा; ‘इंडिया’ आघाडीचा निर्णय, मतदारसंघ फेररचनेला कडाडून विरोध, विरोधकांनी डागली ताेफ..

भोंदू खरातच्या बँक खात्यांची चौकशी, २ वर्षात तब्बल २१ कोटींची उलाढाल; शिर्डीत कोट्यवधींच्या जमिनीची खरेदी, धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT