पुणे

पांगरीत भाजप- राष्ट्रवादी आमने सामने,पदयात्रा,गावभेटीवर जोर

CD

लोगो : पांगरी जि. प. गट
---
प्रचार रॅलींनी तापले
निवडणूक वातावरण
भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट लढत
बाबासाहेब शिंदे : सकाळ वृत्तसेवा
पांगरी, ता. ३ : पांगरी (ता. बार्शी) येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून प्रचार रॅलींना वेग आला असून, गावात निवडणूक वातावरण चांगलेच रंगले आहे. प्रमुख आघाड्यांकडून मतदारांशी थेट संपर्क साधत विकासाच्या मुद्द्यांवर भर दिला जात आहे.
पांगरी येथे भाजप, आरपीआय (आ.) व मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली. बार्शी नगरपालिकेचे नगरसेवक विजय राऊत व भाजप सोलापूर जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रणवीर राऊत यांच्या नेतृत्वाखाली बसस्थानक चौकातून रॅलीला प्रारंभ झाला. गावातील प्रमुख रस्त्यांवरून मार्गक्रमण करत मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. यावेळी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार डॉ. रेश्मा डोके, पंचायत समिती गणाचे उमेदवार शरद बसवंत व कारी गणाचे उमेदवार किरण घुले यांनी नागरिकांशी संवाद साधला. घोषणाबाजी व कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे परिसरात निवडणुकीची धग जाणवत होती.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेही पांगरीत प्रचार रॅली पार पडली. जिल्हा परिषद मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय असल्याचे उमेदवार मीना मोहन विधाते यांनी सांगितले. त्यांच्या सोबत पंचायत समितीचे उमेदवार शिवाजी गायकवाड व कारी गणाचे उमेदवार योगेश मुंढे उपस्थित होते. रॅलीदरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत विकासकामांचा आढावा मांडण्यात आला. अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
---
चौकट
निवडणूक लढतींचे चित्र
- पांगरी जि.प. गट : डॉ. रेश्मा डोके (भाजप) विरुद्ध मीना विधाते (राष्ट्रवादी काँग्रेस)
- कारी गण : उक्कडगाव - किरण घुले (भाजप) विरुद्ध योगेश मुंढे (राष्ट्रवादी काँग्रेस)
- पांगरी गण : शरद बसवंत (भाजप), शिवाजी गायकवाड (राष्ट्रवादी), सागर कदम (वंचित), मिलिंद बनसोडे (अपक्ष)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Insurance: लहान फॉर्म अन् मोठा फायदा! PF खात्यातील या फॉर्मने कुटुंबाला मिळू शकतात 7 लाख रुपये

Hasan Mushrif Kolhapur ZP Political Strategy : बहुमत असूनही पेच? पण मुश्रीफांनी करून दाखवलं 'अशक्य ते शक्य'; कसं जुळवलं सत्तेचं समीकरण? वाचा सविस्तर...

Latest Marathi News Live Update : कल्याण मध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने भव्य मिरवणूक

Thane politics: राजकीय खळबळ! ‘उबाठा’चे चार नगरसेवक शिंदे गटात; मध्यरात्री ठाण्यात पक्षप्रवेश, जिल्हाप्रमुखांच्या हाती ‘धनुष्यबाण’

Crime News : बॅनरवर फोटो खाली का? नाशिकमध्ये नामांकित कॉलेजच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून रात्रभर डांबले

SCROLL FOR NEXT