caterpillars
caterpillars 
पुणे

एेकावे ते नवलच, गावावर हजारो सुरवंटांची दहशत.. 

किशोर कुदळे

वाल्हे (पुणे) : खेडेगावामध्ये कधी कोणत्या कारणाने लोकांमध्ये भीती निर्माण होईल, हे सांगणे कठीण आहे. कधी चोरांची भीती; तर कधी लांडग्यांची भीती. कधी बिबट्याची; तर कधी डासांची भीती... अशा विविध कारणांनी भीतीने लोक त्रस्त होत असताना हरणी (ता. पुरंदर) येथील ग्रामस्थ मात्र सुरवंट या कीटकाच्या भीतीने त्रस्त झाले आहेत. एक- दोन नव्हे तर हजारो सुरवंटांनी जणू काही गावाचा ताबा घेतला आहे. या सुरवंटांमुळे येणारी खाज व होणाऱ्या वेदनेमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. 

हरणी येथील मुख्य चौकामध्ये असलेल्या झाडांच्या खोडामध्ये काही दिवसांपूर्वी थोडे सुरवंट दिसून आले होते. मात्र, मध्यंतरी अवकाळी पावसाच्या काळात या सुरवंटांचे प्रमाण एवढे वाढले, की वटवृक्ष परिसरामधील ओट्यावर, घरांच्या भिंतीवर, घरांमध्ये, झाडावर, अंगणामध्ये पहावे तिकडे सुरवंटच सुरवंट दिसून येत आहेत. हे सुरवंट अंगाला लागल्यानंतर होणाऱ्या वेदना व त्यानंतर सहन करावा लागणाऱ्या मनस्तापामुळे गावातील लहानथोरांसह सर्वजण भयंकर त्रस्त झाले आहेत. गावात डासांसाठी धूरफवारणी केली जाते. उघडी गटारेही बुजवली जाऊ शकतात. मात्र, या सुरवंटांचा बंदोबस्त कसा करायचा, या विवंचनेत गावकरी सापडले आहेत. 

ग्रामस्थांनी या वटवृक्षाभोवती कीटकनाशके फवारले, मात्र त्याला प्रतिसाद न देता सुरवंटांनी आता थेट गावकऱ्यांच्या घरावर मिळेल त्या ठिकाणी उपद्रव सुरू केला असल्याचे ग्रामपंचायत सदस्य महादेव यादव यांनी सांगितले. 

इतर कीटकांचा नाश करण्यासाठी औषधे उपलब्ध आहेत, मात्र आता गावावरती सुरवंटाच्या रूपाने आलेले संकट दूर करण्यासाठी सध्या तरी कोणतेच औषध उपलब्ध नाही. ग्रामसेवकदेखील आजारपणाच्या सुटीवर असल्याने काहीच निर्णय घेता येत नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसांत गावची सभा घेऊन त्याद्वारे निर्णय घेणार आहे. 
- सुवर्णा यादव, 
सरपंच, हरणी (ता. पुरंदर) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. लातूरमधील मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Rohit Sharma Crying : पुन्हा एकदा फ्लॉप ठरल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये रोहित शर्माला अश्रू अनावर; व्हिडिओ व्हायरल

Women Abuse Case : मोठी बातमी! परदेशातून परतताच विमानतळावर 'या' खासदाराला होणार अटक? एसआयटी झाली सतर्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

SCROLL FOR NEXT