Leopard News sakal
पुणे

Leopard News : वळतीत बिबट्याची दहशत;शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण

सायंकाळी सहा वाजण्याचा सुमारास शेतकरी दत्ता भोर हे जनावरांसाठी चारा आणण्यास ट्रॅक्टर घेऊन जात असताना बाबा मंदिर परिसरात रस्त्याच्या कडेला बिबट्या बसलेला त्यांना दिसला .

सकाळ वृत्तसेवा

निरगुडसर : सायंकाळी सहा वाजण्याचा सुमारास शेतकरी दत्ता भोर हे जनावरांसाठी चारा आणण्यास ट्रॅक्टर घेऊन जात असताना बाबा मंदिर परिसरात रस्त्याच्या कडेला बिबट्या बसलेला त्यांना दिसला . ट्रॅक्टरचा हॉर्न बऱ्याच वेळा वाजवला तरी देखील बिबट्या काही हलेना,बऱ्याच वेळाने बिबट्याने जागा सोडली ही घटना वळती ( ता . आंबेगाव )येथील मालजे वस्तीजवळ शनिवार (ता.१८) रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.

वळती येथील मालजे वस्ती परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून शेतकऱ्यांना दररोज दिवसा ढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. वळती गावच्या पूर्वेला.

मालजे वस्ती असून येथील बाबा मंदिर परिसरात ओढ्याचे पात्र आहे,आणि याठिकाणी उसाचे क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणात आहे शनिवार ( ता.१८ ) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दत्ता भोर हे शेतकरी जनावरांसाठी मका कापण्यास ट्रॅक्टर घेऊन चालले होत असता शेतकरी बाबा मंदिर परिसरात रस्त्याच्या कडेला बिबट्या बसलेला त्यांना दिसला,शेतकरी भोर यांनी ट्रॅक्टरचा हॉर्न बऱ्याच वेळ वाजवला परंतु बिबट्या काही जागेवरून हलला नाही.

त्यानंतर दत्ता भोर यांनी मोबाईल मध्ये बिबट्याचे शुटींग केले आणि बऱ्याच वेळाने बिबट्या तेथून सावकाशपणे निघून गेला,या प्रकारामुळे मालजेवस्ती परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. दोन दिवसांपूर्वी येथील रवींद्र विठ्ठल भोर यांचे कुत्रे देखील बिबट्याने ठार केल्याची घटना घडली होती तसेच अनेक शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन देखील झालेले आहे.

वनविभागाने मालजेवस्तीत पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी भाऊसाहेब भोर, रवींद्र भोर,दत्ता भोर आदी शेतकऱ्यांनी केली आहे.फोटो खाली ओळ: मालजेवस्ती-वळती (ता.आंबेगाव) येथे शेतकरी दत्ता भोर यांना बिबट्याचे दर्शन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT