Panipat Bike Rally sakal
पुणे

पानिपत गाथेची शौर्यज्योत प्रज्वलित ठेवण्यासाठी 'पानिपत दुचाकी मोहीम'

पूर्वजांच्या कार्याला अभिवादनासाठी सशक्त भारत अभियानाची ६ ते २६ जानेवारीला पुणे पानिपत पुणे अशी दुचाकी मोहीम

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : पानिपत (Panipat) येथे आपल्या पूर्वजांनी बलिदान दिले. त्यांच्या या कार्याला अभिवादनासाठी ६ ते २६ जानेवारी दरम्यान पुणे पानिपत पुणे अशी दुचाकी मोहीम (Pune-Panipat Bike Rally) सशक्त भारत अभियान यांच्या वतीने आयोजित केली आहे. पानिपत येथू १४ जानेवारी रोजी पूर्वजांच्या पराक्रमी गाथा सांगणारी शौर्यज्योत पुण्यात आणली जाणार आहे. ती शौर्यज्योत चिरंतन प्रज्वलित ठेवली जाणार आहे.

यंदाचे वर्ष हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि पानिपतचे २६१ वे वर्ष आहे. या उपक्रमात खडकवासला, कोंढवे धावडे, बावधन, भूगाव परिसरातील युवक या कार्यक्रम आयोजनात सहभाग आहे. 'सशक्त भारत' या संकल्प समूहाने पुणे ते पानिपत दुचाकी अभिवादन मोहिमेची आखणी केली आहे. शनिवारवाड्याच्या मैदानातून दि. ६ जानेवारी २०२२ ला सुरू होणार आहे. ही दुचाकी मोहीम २६० वर्षापूर्वी मराठ्यांच्या फौजांच्या मार्गाने प्रवास करत १४ जानेवारी २०२२ ला पानिपतावर राष्ट्र समर्पण जागरण सभा घेऊन संपेल.

परतीच्या मार्गात पानिपतावर प्रज्वलित केलेली शौर्यज्योत घेऊन एक हजार ६७० किलोमीटरचे अंतर केवळ १३ दिवसांत धावत- धावत पार करून आपल्या देदीप्यमान पराक्रम करणाऱ्या पूर्वजांचे यथोचित स्मारक चिरंतन ज्योतीच्या रूपाने प्रजासत्ताक दिनी, २६ जानेवारीला पुण्यात स्थापित केलं जाणार आहे. पुणे ते पानिपत व परत पुणे अशा संपूर्ण मोहीम मार्गात एकूणात ३७ भुईकोट व ०७ गिरीदुर्गाचे सखोल अध्ययन करताना २७ तीर्थक्षेत्रांचेही दर्शन घेतले जाणार आहे.

'पानिपत शौर्यस्थळाला भेट देऊ इच्छिणाऱ्या युवक- युवतींना मोहिमेत सहभागी होता येईल. पानिपतचे तिसरे युद्ध ही हार नसून, मराठ्यांच्या इतिहासातील सर्वोच्च पराक्रमाची गाथा आहे. अहमद शाह अब्दाली जेता ठरूनही तो दिल्लीच्या गादीवर बसू शकला नाही, ना दिल्लीचा बादशहा ठरवू शकला, ना त्याच्या मर्जीतील नजीबाला वजीर बनवू शकला ! लौकिकदृष्ट्या पराभूत होऊनही मराठ्यांनी दिल्लीतील सत्ताकेंद्र आपल्या इच्छेने स्थापित केले आणि इसवी सनपूर्व ३२७ पासून सुमारे दोन हजार वर्षे या देशावर सुरू असलेल्या आक्रमकांच्या टोळधाडींच्या वाटा कायमस्वरूपी बंद केल्या. आपल्या पूर्वजांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुणे ते पानिपत या दुचाकी अभिवादन मोहिमेचे व आयोजन केले आहे,' असे महिंद हे यांनी सांगितले.

राष्ट्रीय एकतेच्या भावाचे पुनरूज्जीवन करण्यासाठी आयोजिलेल्या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन सर्वांना करण्यात आलं आहे. आपापल्या वाहनांनी पानिपताच्या रणभूमीवर येऊ इच्छिणाऱ्या, विजिगीषु वृत्तीच्या युवक-युवतींनी www.sashaktabharat.com या संकेतस्थळास भेट देवून सुधीर- ९६२३१ ३८९९९, योगेश- ८८७९१ २४२१३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: अजित पवारांनी विजय वडेट्टीवारांची घेतील सांत्वनपर भेट

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT