Dr. Neelam Gorhe sakal media
पुणे

पानिपत येथील स्मारकाची दुरवस्था दूर करणार : डॉ. नीलम गोऱ्हे

पानिपत येथील स्मारकाची दुरवस्था दूर करण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पानिपत येथील मराठा स्मारकाची दुरवस्था झाली असून, ती दूर करावी अशी मागणी पानिपत येथे झालेल्या युद्धानंतर तेथेच स्थायिक झालेल्या रोड मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांच्याकडे केली. त्यावर पानिपत येथील स्मारकाची दुरवस्था दूर करण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.

पानिपत येथे सदाशिवभाऊ पेशवे यांचा पुतळा उभारावा, हरियाना राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन करावा. तसेच, ग्रंथालय उभारण्यात यावे, यासह इतर मागण्या शिष्टमंडळाने केल्या. त्यावर डॉ. गोऱ्हे यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे साहाय्याने हा प्रश्न सोडविण्यात येईल, असे आश्वासन दिले.

तसेच, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारानुसार महाराष्ट्रातील आणि हरियानात स्थायिक झालेले मराठी बांधव यांचा संपर्क स्थापित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी रोड मराठा समाजाचे कमलजित महाले, सुरेंद्र दाभाडे, चंद्रकांत मोकाटे, विराज तावरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Changes: गणेशोत्सवात पुण्यात मोठा वाहतूक बदल; 12 ते 26 सप्टेंबरपर्यंत 'या' रस्त्यांवर जड वाहनांना बंदी

रखडलेल्या ठाकुर्ली उड्डाणपुलाला मुहूर्त, सात खासगी मिळकतींचा प्रश्न मार्गी; १० वर्षांचा तिढा सुटला

iPhone 18 लाँच होताच जुन्या iPhoneच्या किमती वाढल्या! iPhone 17, iphone 17 pro सह कोणते मॉडेल महागले?

Marathi News Live Updates :गौतमी पाटलांविरोधात भाजप नेत्या आक्रमक, अश्लील हावभाव केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार

क्रिकेटच्या कारभारात मोठा बदल होणार? सर्वोच्च न्यायालयाने BCCIसमोर उपस्थित केला ‘हा’ सवाल; १२ वर्षांपासून प्रलंबित प्रकरण पुन्हा चर्चेत

SCROLL FOR NEXT