The papaya marigold crop burned to using mixed pesticides in narayangaon pune
The papaya marigold crop burned to using mixed pesticides in narayangaon pune 
पुणे

किटकनाशकात तणनाशक मिसळल्याने पपई व झेंडूची बाग करपली; शेतकऱ्याचे 5 लाखांचे नुकसान 

रवींद्र पाटे

नारायणगाव(पुणे): फवारणीसाठी तयार केलेल्या किटकनाशकात अज्ञात व्यक्तीने तणनाशक मिसळल्याने हिवरे तर्फे नारायणगाव येथील शेतकरी शिवानंद पोखरकर यांच्या तीन एकर क्षेत्रातील पपई व झेंडूची झाडे करपल्याने सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पोखरकर यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात २६ ऑक्टोबरला तक्रार दिली आहे.

शिवाशंकर पोखरकर यांची हिवरे तर्फे नारायणगाव (ता.जुन्नर) येथे नारायणगड डोंगराच्या पायथ्याशी बागायती शेती आहे. सुमारे तीन महिन्यापूर्वी त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करून सहा एकर क्षेत्रात (सर्व्हे क्र.४२०/१) आईस बेरी या संकरीत पपईच्या रोपांची लागवड केली होती. पपईच्या बागेत आंतरपिक म्हणून झेंडूची लागवड केली होती. यासाठी पोखरकर यांनी सुमारे दहा लाख रुपयांचा भांडवली खर्च केला होता.
झेंडूच्या फुलांचा तोडणी हंगाम सुरू झाला होता. तर पपईची झाडांना फुले येण्यास सुरुवात झाली होती.

दुखःद ! मुलाचा रांजणखळग्यात बुडून मृत्यू, वडिलांचे हृदयविकाराने निधन​

२३ ऑक्टोबरला पोखरकर यांनी कामगारांना टाकीमध्ये औषध तयार करून दिले. तीन ओळींची फवारणी झाल्यानंतर कामगारांना उर्वरित फवारणी करण्यास सांगुन ते कामानिमित्त बाहेर गेले. दरम्यानचा काळात अज्ञात व्यक्तीने तणनाशक औषधाच्या टाकीमध्ये मिसळले. फवारणी केलेल्या तीन एकर क्षेत्रातील पपई व झेंडूची झाडे दोन दिवसांनंतर करपली, मात्र पोखरकर यांच्या उपस्थितीत फवारणी केलेल्या तीन ओळीतील झाडे करपली नाहीत. अज्ञात व्यक्तीने तणनाशक मिसळल्याने पपई व झेंडूची झाडे करपून मोठे आर्थिक नुकसान झाले असून हंगाम वाया गेला आहे. या प्रकरणी पोखरकर यांनी २६ ऑक्टोबरला नारायणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

औषधाच्या टाकीमध्ये तणनाशक मिसळल्याने यापुर्वी नारायणगाव, येडगाव, वारूळवाडी भागांत द्राक्षबागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरवर्षी या घटना घडत आहेत. मात्र या प्रकरणी कायदेशीर कारवाई होत नसल्याने शेती पिकांचे नुकसान करणाऱ्याचे धाडस वाढले आहे. शेतीचा बांध, रस्ता, वाटप, वहिवाट आदी  कारणांवरून शेजारील शेतकरी अथवा भावबंधामध्ये वाद असतात. यावरून पिकांचे नुकसान करण्याचे प्रकार घडतात.

बाळासाहेबांच्या वेळी राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत पण आता पुण्यात : संजय राऊत

शेतीच्या नुकसानीची वर्ष भरातील पाचवी घटना:
शेतीच्या नुकसानीची नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्ष भरातील ही  पाचवी घटना आहे. यापैकी एकाही घटनेचा पोलिसांना अद्याप शोध लागला नाही. मांजरवाडी येथील रत्ना विटे यांची जम्बो द्राक्षाच्या अठराशे वेली, प्रभाकर मुळे यांची कलमी पेरूची झाडे, निमगावसावा येथील शरद पाबळे यांची पपईची झाडे, नारायणगाव येथील सतिश पाटे यांच्या शेतातील कलमी आंबा व जांभूळ फळझाडे आज्ञात व्यक्तीने तोडून टाकून लाखो रुपयांचे नुकसान केले होते. नैसर्गिक संकटामुळे मेटाकुटीला आलेले शेतकरी मानवी संकटापुढे हतबल झाले आहे.

'पदवीधर'साठी भाजपचे महानोंदणी अभियान; अडीच हजार कार्यकर्ते उतरणार रस्त्यावर​

''पिकांचे नुकसान करण्यासाठी तणनाशकाचा वापर केला जातो. हा धोका टाळण्यासाठी फवारणी करताना कामगारांवर विसंबून न राहता स्वतः उपस्थित राहून शेतकऱ्यांनी फवारणी करून घ्यावी. सध्या  द्राक्ष हंगाम सुरू झाला असून द्राक्ष बागावर फवारणीची कामे सुरू आसल्याने शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी.''
- अवधूत बारवे( प्रगतशील शेतकरी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT