पुणे

पॅराक्वॉट डाय-क्लोराइडवर देशव्यापी बंदीची तयारी

CD

पान २

पॅराक्वॉट डाय-क्लोराइडवर
देशव्यापी बंदीची तयारी

तीव्र विषारी परिणामांमुळे केंद्राची हालचाल; तज्ज्ञ समितीची शिफारस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या ‘पॅराक्वॉट डाय-क्लोराइड’ या तणनाशकावर केंद्र सरकार देशव्यापी बंदी घालण्याच्या तयारीत आहे. या रसायनामुळे विषबाधा, मूत्रपिंड निकामी होणे, फुफ्फुसांमध्ये तंतुमयता (लंग फायब्रोसिस) आणि पार्किन्सन्ससारखे गंभीर आजार उद्भवत असल्याचे पुरावे समोर आल्यानंतर तज्ज्ञ समितीने बंदीची शिफारस केली आहे.
डॉक्टर आणि कृषी शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या समितीने या तणनाशकाच्या विषारी परिणामांचा आणि सार्वजनिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून संपूर्ण बंदीची शिफारस केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तेलंगणा आणि ओडिशा या राज्यांनी यापूर्वीच तात्पुरती निर्बंधात्मक कारवाई करत केंद्र सरकारकडे कायमस्वरूपी बंदीची मागणी केली होती.
पॅराक्वॉटचा वापर चहा, रबर, कॉफी, कापूस, भात, गहू, मका, बटाटा, द्राक्षे आणि सफरचंद पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. कालवे, तलाव आणि जलमार्गांमधील तण नियंत्रणासाठीही हे रसायन वापरले जाते. कमी खर्च आणि त्वरित परिणामामुळे हे तणनाशक शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाले होते. मात्र बंदी लागू झाल्यास तण व्यवस्थापनाच्या पद्धतींमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता असून, रासायनिक तणनियंत्रणावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होऊ शकते.
केंद्र सरकारने २०१५ मध्ये सुरक्षित पॅकेजिंग, सावधगिरीची सूचना आणि विषबाधा हाताळण्यासाठी वैद्यकीय प्रशिक्षण यांसारख्या अटींसह या तणनाशकाच्या वापराला परवानगी दिली होती. मात्र इतर देशांत बंदी किंवा निर्बंध असलेल्या ६६ कीटकनाशकांचा अभ्यास करणाऱ्या अनुपम वर्मा समितीच्या शिफारशींनंतर सरकारने पुन्हा पुनर्विचार सुरू केला. त्यानंतर पॅराक्वॉटच्या सुरक्षितता, कार्यक्षमता आणि विषारीपणाचा नव्याने अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र उपसमिती नेमण्यात आली होती.
व्यापाराशी संबंधित आकडेवारीनुसार, सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत असतानाही या तणनाशकावरील अवलंबित्व कायम आहे. २०१९-२० मध्ये ८,५९८ टन असलेली आयात २०२२-२३ मध्ये २०,७८६ टनांपर्यंत वाढली. देशांतर्गत विक्री २०२०-२१ मध्ये घटली होती; मात्र २०२३-२४ मध्ये ती पुन्हा १.०५ लाख टनांवर पोहोचली.
तेलंगणाने १ एप्रिलपासून ६० दिवसांसाठी पॅराक्वॉटच्या विक्री, वितरण आणि वापरावर बंदी घातली होती. विद्यमान नियमांनुसार राज्य सरकारांना एवढ्याच कालावधीसाठी निर्बंध लागू करता येतात. ओडिशानेही २०२३ मध्ये अशाच प्रकारचे पाऊल उचलले होते.
‘द नॅशनल मेडिकल जर्नल ऑफ इंडिया’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, पॅराक्वॉट हे ‘अत्यंत विषारी संयुग’ असून ते गिळल्यास, श्वसनातून शरीरात गेल्यास किंवा त्वचेद्वारे शोषले गेल्यास गंभीर आजार आणि मृत्यूही ओढवू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला ऐनवेळी धक्का! पाठिंब्याचं पत्र खोटं असल्याचा आरोप, आमदार बेपत्ता; TVKची तारेवरची कसरत, बहुमत जुळेना

Mumbai Bengaluru Vande Bharat : मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत’ अखेर मिरजमार्गे धावणार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

LPG Cylinder Price: घरगुती गॅसपासून वाहनांच्या इंधनापर्यंत मोठी अपडेट; तुमच्या शहरात आजचा दर किती?

Pandharpur 10th Board Result: गवंड्याच्या मुलीचा दहावीच्या परिक्षेत डंका साक्षी वाघमारे 83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

नको बक्षिसे...नको मिरवणुका, आमच्या यशाची दखल तरी घ्या!; थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या सात्त्विकराज रंकीरेड्डी याची खंत

SCROLL FOR NEXT