परभणीत आढावा बैठक;
सर्व विभागप्रमुखांना निर्देश
अॅग्रोवन वृत्तसेवा
परभणी ः दुष्काळी स्थितीत शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी विभागप्रमुखांनी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे. विविध विभागांकडील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून विकासकामांना गती द्यावी, असे निर्देश नूतन जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी दिले.
जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सोमवारी (ता. २) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन विभागनिहाय कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. या वेळी ते म्हणाले, की दुष्काळात शेतकरी आणि ग्रामीण भागातील जनतेला दिलासा देणे आवश्यक आहे. संबंधित विभागांनी दुष्काळ निवारणासाठी आवश्यक उपाययोजनांचे प्रभावी नियोजन करून त्यांची काटेकोर अंमलबजावणी करावी. नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनातील सर्व यंत्रणांनी संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने काम करावे. समन्वयाच्या अभावामुळे कोणतेही काम रखडणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच कामांची अचूकता, गुणवत्ता आणि वेळेचे नियोजन यांना प्राधान्य द्यावे. प्रत्येक विभागाने आपापल्या जबाबदाऱ्या निश्चित करून कामांचा नियमित आढावा घ्यावा आणि निर्धारित वेळेत कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत.
या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर, अप्पर जिल्हाधिकारी शोभा जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, शैलेश लाहोटी, युवराज डापकर आदींसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
परभणी ः जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.